लष्कर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी राजेश तटकरे तर आर्थिक गुन्हे शाखेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी अशोक कदम यांची नियुक्ती...
पुणे :- (संपादक मुज्जम्मील शेख), लष्कर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक आनंदराव कदम यांची बदली करण्यात आली आहे. त्यांनी मागील काही दिवसांपूर्वीच बदलीची मागणी केली होती. त्यावरून त्यांच्या बदलीचे आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी दि. 4 एप्रिल रोजी मंगळवारी काढले आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांची आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे. तर खडक पोलिस ठाण्यात गुन्हे पोलिस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या राजेश रामचंद्र तटकरे यांची लष्कर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दोन्ही पोलिस निरीक्षकांनी नवीन पदस्थापनेच्या ठिकाणी त्वरीत हजर होऊन कार्यभार धारण करावा असे आदेशात नमुद करण्यात आले आहे. त्यापैकी लष्कर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक तटकरे यांनी त्वरित कार्यभार हातात घेतला आहे. आणि लष्कर ठाण्यातील कनिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बैठका देखील घेतलेले आहेत. तसेच अशोक कदम यांनी कार्यभार काही दिवसांनंतर स्वीकारणार असल्याचे सांगितले आहे.
लष्कर पोलीस ठाण्याला अशोक कदम यांच्या सारखे अधिकारी मिळणे अशक्य...
तत्कालीन लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांचे कार्यपद्धती लोकांबरोबर संवाद नागरिकांना सामंजस्य पणे सर्व गोष्टी समजावणे आणि मनमिळाऊपणे वावरणे असे अधिकारी मागील काळात होऊ शकले नाहीत. ज्या पद्धतीने कदम यांनी बाल स्नेही पोलीस स्टेशन, संगीताच्या माध्यमातून सुंदर गीतांचा कार्यक्रम असे अनेक वेगवेगळे उपक्रम त्यांनी आपल्या कार्यकाळात राबवले होते. ज्यावेळी त्यांनी आपले चार्ज स्वीकारले होते त्यावेळी कोरोनाचा काळ सुरू होता त्यामध्ये काही व्यापार पेटीतील व्यापाऱ्यांनी कोरोना काळात आंदोलन घेतले होते त्याला आमचे संपादक मुज्जम्मील शेख यांना सोबत घेऊन आंदोलन करताना शांतपणे समजावून तो आंदोलन रद्द केला होता. असे अनेक कार्य त्यांच्या कार्यकाळात झाले आहे.
Post a Comment
0 Comments