खुनासारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाकडून 60 दिवसाच्या आत आरोपीची ॲडव्होकेट कुणाल खोपडे यांनी युक्तिवाद करून केली मुक्तता...
पुणे :- पुण्यात 17 डिसेंबर 2022 रोजी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात खून झाल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणातील आरोपीचे वकील ॲडव्होकेट कुणाल बबन खोपडे यांनी वरील एफआयआर ही खोट्या पद्धतीने केली गेली असून, सदर खुणाच्या केस मध्ये उपरोक्त आरोपी याचे नाव संकेत पवार एफआयआर मध्ये नमूद नसून सदर व्यक्तीकडून कोणत्याही प्रकारची रिकवरी झालेली नाही. उपरोक्त आरोपीस भादवी 302 हे कलम लागू होत नाही. सदर एफआयआर मध्ये उशीर का झाला हे देखील तपास अधिकारी यांनी सांगितले नाही. आरोपी हा फक्त 19 वर्षाचा असून त्याला जर जामिनावर मुक्त नाही केले तर त्याचे पुढील भविष्य हे खराब होईल, जवळजवळ गुन्ह्याचा तपास हा पूर्ण झालेला आहे. सदर आरोपीस जामिनावर मुक्त करण्यात यावे असा युक्तिवाद खुणासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट कुणाल बबन खोपडे यांनी केला. आणि पुणे जिल्हा व सत्र न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.एस.वाघमारे यांनी 60 दिवसाच्या आत दि. 6 मार्च 2023 रोजी सदर आशिल संकेत पवार याला जामिनावर मुक्त करण्यात आले. अश्या अनेक केसेस ॲडव्होकेट कुणाल खोपडे यांनी पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात फौजदारी गुन्ह्यातील युक्तीवादात त्यांची चांगली पकड असल्याचे निदर्शनास आले आहे.
Post a Comment
0 Comments