Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेनेच्या पुणे शहराध्यक्षपदी विजय रजपूत यांची निवड...


महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेनेच्या पुणे शहराध्यक्षपदी विजय रजपूत यांची निवड...
पुणे : (प्रतिनिधी मुज्जम्मील शेख), पुणे शहर महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेनेच्या पुणे शहराध्यक्षपदी विजय अण्णा राजपूत यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाचे जेष्ठ नेते अनिल शिदोरे, बाबू वागस्कर, अजय शिंदे, वसंत मोरे यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण जनअधिकार सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष हेमंत संभूस यांच्या शिफारशीने विजय अण्णा रजपूत यांची महाराष्ट्र नवनिर्माण जनअधिकार सेनेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. विजय रजपूत हे विविध सामाजिक उपक्रमामध्ये यांचा सहभाग असतो. तसेच वेगवेगळे सामाजिक उपक्रम ते राबवत असतात. मागील चार वर्षे त्यांनी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे रुग्णालयात मोफत चहा नाश्ता आणि जेवणाची सोय रुग्णांसाठी केली होती. नियुक्तीचे पत्र भेटल्यानंतर राजपूत यांनी सांगितले की मी गोरगरीब जनतेचसाठी, कामगार यांच्या न्यायासाठी आणि हक्कांसाठी लढणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आणि लवकरच विविध फायनान्स कंपन्या यांच्या विरोधात जनआंदोलन राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments