Type Here to Get Search Results !

विमानतळ पोलीस ठाण्याची उत्तम कामगिरी ; विमानाने पुण्यामध्ये येवुन महागडे फोन चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद ; ३० लाख रुपयांचे मोबाईल फोन केले जप्त...

विमानतळ पोलीस ठाण्याची उत्तम कामगिरी ; विमानाने पुण्यामध्ये येवुन महागडे फोन चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद ; ३० लाख रुपयांचे मोबाईल फोन केले जप्त...
पुणे :- विमानतळ पोलीस ठाणेचे हददीत महालक्ष्मी लॉन्स पुणे नगर रोड येथे दिनांक २४/०२/२०२३ ते दिनांक २६/०२/२०२३ दरम्यान व्हिएववन सुपरसोनिक कॉन्सर्ट या आयोजित कार्यक्रमामध्ये मोबाईल चोरी होत असल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. त्याअनुषंगाने वपोनि विलास सोडे यांचे आदेशान्वये विमानतळ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी रविंद्र ढावरे व तपास पथकातील स्टाफ असे सदर ठिकाणी पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी सपो फौजदार अविनाश शेवाळे यांना एक संशयित इसम दिसला त्यास थांबण्याचा प्रयत्न केला असता तो पळुन जावु लागला. त्यावेळी पोलीस अंमलदार थोपटे व बर्डे यांनी सदर इसमाचा पाठलाग करुन त्यास पकडले. तेव्हा त्याने त्याचे नाव असद गुलजार महंमद रा. दिल्ली असे असल्याचे सांगितले. त्यास विश्वासात घेवुन चौकशी करता त्याने आम्ही व्हिएचवन सुपरसॉनिक कॉन्सर्ट या कार्यक्रमामध्ये मोबाईल फोन चोरी करण्यासाठी दिल्ली येथुन आलो असुन माझे साथीदार हे मिलन हॉटेल, पुणे स्टेशन येथे आहेत. लागलीच वपोनि श्री. विलास सोडे यांना सदरची बातमी कळवून तपास पथकातील अधिकारी व स्टाफ यांनी मिलन हॉटेल पुणे स्टेशन येथे जावुन चार इसमांना ताब्यात घेतले ताब्यात घेतले इसम नामे १) असद गुलजार महंमद वय ३२ वर्षे रा ११६५ सोनारवाली रोड कलामहल उंचा छलान दिल्ली २) निजाम बाबु कुरेशी वय ३५ वर्षे रा. १०६ जवाहर पार्क शालीमार गार्डन साहिबाबाद गाझीयाबाद उत्तरप्रदेश ३) शाहबाज भोले खान वय २६ वर्षे रा गल्ली नं १ कबीर नगर महादेव मंदीराशेजारी दिल्ली ४) राहुल लीलीधर कंगाले वय ३० वर्षे रा बी१/१५१ डी.एल.एफ कॉलनी भोपरा साहीबाबाद गाझीयाबाद उत्तरप्रदेश ५) नदीम इब्राहिम मलीक ४० वर्षे रा सी / ११२ / २० गल्ली नं १९ नॉर्थ गोडा यमुनानगर शेजारी दिल्ली यांचेकडुन एकुण २८,४०,०००/- रुपये किंमतीचे एकुण ३९ महागडे मोबाईल फोन जप्त केलेले आहेत.
तसेच सदर दिनांक २४/०२/२०२३ रोजी मोबाईल फोन चोरी करणारा इसम प्रशांत के. कुमार, मु.पो. भोवी कॉलनी ता. भद्रावती शिमोगा राज्य कर्नाटक यास सुध्दा विमानतळ पोलीस स्टेशन तपास पथकाने ताब्यात घेतले असून त्याचेकडुन एकुण १,८७,०००/- रुपये किंमतीचे एकुण ५ मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत सदर बाबत गु.र.नं. १०५ / २०२३ भादंविक ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल आहे असे एकुण ३०,२७,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक रविंद्र ढावरे करीत आहेत.

सदरची कामगिरी पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजन कुमार शर्मा, पोलीस उप आयुक्त शशिकांत बोराटे, सहा पोलीस आयुक्त किशोर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमानतळ पोलीस स्टेशन विलास सोंडे, पोलीस निरीक्षक गुन्हे संगीता माळी, पोलीस उप निरीक्षक रविंद्र ढावरे, समु चौधरी, पोलीस अंमलदार अविनाश शेवाळे, सचिन कदम, सचिन जाधव, रुपेश पिसाळ, अंकुश जोगदंडे, नाना करचे, योगेश थोपटे, दादासाहेब बर्डे, ज्ञानदेव आवारी, शिवराज चव्हाण यांचे पथकाने केलेली आहे.

Post a Comment

0 Comments