कोरेगाव पार्क परीसरात मोठ मोठ्या आवाजात साऊंड सिस्टीम लावुन संगीत वाजवणारे द डेली रेस्टॉरंट अँड बारवर सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई करून साऊंड सिस्टीम आणि डिजे मिक्सर केले जप्त...
पुणे ;- दि. २५.०१.२०२३ रोजी सामाजिक सुरक्षा विभागातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे कोरेगाव पार्क परीसरात पेट्रोलिंग करीत असताना, कोरेगाव पार्क लेन नं. ७ पुणे येथे द डेली रेस्टॉरंट अँड बार मध्ये मोठया आवाजात सांउड सिस्टिमचा आवाज येत असल्याचे त्यांचे निदर्शनास आले.
त्यांनतर त्यांनी सदर ठिकाणी खात्री केली असता द डेली रेस्टॉरंट अँड बार कोरेगाव पार्क, पुणे येथे मोठं मोठया आवाजात साऊंड सिस्टिमवर संगित सुरू असल्याचे आढळल्याने त्यांनी सदर हॉटेलवर कारवाई करून २,३०,०००/- रु (दोन लाख तीस हजार) किंमतीचे साऊंड सिस्टिम जप्त केली असुन, सदर हॉटेलचे मॅनेजर विरूध्द पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ अंतर्गत ध्वनी प्रदुषण (विनियमन व नियंत्रण सन २०००) अधिनियम अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
सदर ठिकाणी ध्वनीप्रदुषण व पर्यावरण संरक्षण कायद्या अन्वये ध्वनीप्रदुषण नियमावली नुसार कारवाई करणेकामी जप्त मुद्देमाल (साऊंड सिस्टीम) कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिला आहे.
सदरची कारवाई पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त गुन्हे अमोल झेंडे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, सपोनि अश्विनी पाटील, पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, संदीप कोळगे, अमित जमदाडे या पथकाने केली आहे.
Post a Comment
0 Comments