Type Here to Get Search Results !

खडकी कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटलमधील डॉक्टर करतायेत महिला रुग्णांशी विनयभंग? रुग्णांनी केली निवासी वैद्यकीय अधिकारी भोसले यांच्याकडे तक्रार...

खडकी कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटलमधील डॉक्टर करतायेत महिला रुग्णांशी विनयभंग? रुग्णांनी केली निवासी वैद्यकीय अधिकारी भोसले यांच्याकडे तक्रार...

पुणे :- भारताच्या संस्कृतीत आपण ज्या डॉक्टरला आरोग्य दूत असे समजतो तेच आरोग्य दूत दानव झाल्याचे पाहायला मिळत आहेत. पुण्यात असलेले खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड जनरल हॉस्पिटलमध्ये अतिशय घाणेरडा प्रकार घडला आहे. कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेले डॉक्टर लाडी यांनी विनयभंग केल्याचा आरोप सध्या खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डात आणि परिसरात चांगलंच गाजलंय. मागील काही दिवसांपासून खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डात चर्चेचा विषय ठरलेला हॉस्पिटलचा मुद्दा आता त्यावर अल्पविराम लागला आहे. बऱ्याच दिवसांपासून आमचे प्रतिनिधी यांच्याकडून या गोष्टीचा सलग पाठपुरवठा करत असताना ही माहिती समोर आली आहे की, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हॉस्पिटलमध्ये एका मुलीचे तपासणी करिता बोलावून त्याबरोबर अश्लील कृत्य करण्याचे प्रकार खडकी कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटलमध्ये घडले आहे. याबाबत सदर मुलीच्या आईने हा प्रकार खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हॉस्पिटलचे प्रमुख भोसले सर यांच्या कडे तक्रार केली असता त्यांनी त्यावर चौकशी करून कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे. याबाबत आमच्या प्रतिनिधीने निवासी वैद्यकीय अधिकारी भोसले यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, आम्ही खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कानावर ही बाब घातली असल्याचे सांगितले आहे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या प्रकरणाबद्दल लैंगिक अत्याचार समिती कडे हा प्रकरण पाठवून त्यावर कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे. परंतु असे किती प्रकार घडले आहेत ह्यावर सर्व ठिकाणी चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणात सदर डॉक्टर लाडी यांच्यावर कॅन्टोन्मेंट बोर्ड कोणती कारवाई करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments