Type Here to Get Search Results !

बोपदेव घाटामध्ये शस्त्राचा धाक दाखवून मोबाईल फोन लुटणाऱ्या गुन्हेगारांना कोंढवा पोलीस तपास पथकाने जेरबंद करून ८ गुन्हे केले उघड...

बोपदेव घाटामध्ये शस्त्राचा धाक दाखवून मोबाईल फोन लुटणाऱ्या गुन्हेगारांना कोंढवा पोलीस तपास पथकाने जेरबंद करून ८ गुन्हे केले उघड...

पुणे :- (संपादक मुज्जम्मील शेख), दि. १६/०१/२०२३ रोजी रात्रौ २२:३० वा चे सुमारास फिर्यादी नामे मुस्तफा एहजेम खान, वय २२ वर्षे, धंदा शिक्षण, रा. दिनर्शा अपार्टमेंट, फ्लॅट नं ४०२ ताज बेकरी जवळ, चुडामन तालीम, कॅम्प, पुणे हे त्यांचा मित्र नामे याहना खान याचे सह बोपदेव घाट येथील टेबल पॉटवर येवलेवाडी, कोंढवा बु., पुणे येथे गप्पा मारत बसलेले असताना त्यांच्या पाठीमागून होंडा सी.डी. ११० दुचाकी गाडीवरून आलेल्या तीन अनोळखी इसमांनी त्यांना शस्त्राचा धाक दाखवून त्यांचेकडील वन प्लस व रेड मी कंपनीचे एकुण ०२ मोबाईल फोन, एक स्मार्ट वॉच, व १०,०००/- रू रोख रक्कम बळजबरी काढून घेवून त्यांच्या कडील होंडा सी.डी. ११० दुचाकी गाडीवरून पळून गेले. त्याबाबत कोंढवा पोलीस ठाणे
पुणे गु.र.नं. ६० / २०२३ भा.दं.वि. कलम ३९२, ५०६ ( २ ) ३४ तसेच भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरचा गुन्हा घडल्यानंतर कोंढवा पोलीस तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल पाटील व तपास पथकातील अंमलदार यांनी तपास सुरू केला. दि.२८/०१/२०२३ रोजी रात्रौ तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल पाटील, पोहवा / ११६१ चव्हाण, पोना/८४८६ चिनके, पोना/७७८२ पवार, पो.अं./८५९१ होळकर, पो.अं. / ९८३८ बनसुडे, पो. अं. / २१८५ मदन, व पो.अ./ १०११६ भोसले यांनी बोपदेव घाटातील टेबल पॉटवर सापळा लावला व तपास पथकातील पो.अं. / ९८३८ बनसुडे, पो. अं. २१८५ मदन हे पब्लीक म्हणून सदर ठिकाणी गप्पा मारत बसले होते. त्यावेळी होंडा सी.डी. ११० व होंडा अॅक्टीवा दुचाकी गाडीवरून सहा आरोपी आले व त्यांनी पब्लीक म्हणून बसलेल्या पोलीसांना त्यांच्या कडील शस्त्राचा धाक दाखवून मोबाईल फोनची मागणी केली. त्याच वेळी पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल पाटील व तपास पथकातील ईतर कर्मचारी यांनी सदर सहा इसमांपैकी चार आरोपी व एका विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतले एक आरोपी अंधाराचा फायदा घेवून तेथून पळून जाण्यात यशस्वी झाला. ताब्यात घेतलेले आरोपी नामे १) यश रमेश ढेबे वय १९ वर्षे, रा. गल्ली नं १६, नवीन वसातह, भैरवनाथ मंदिर मागे, कात्रजगाव, कात्रज, पुणे २) विशाल रामनिवास गौतम, वय १९ वर्षे, रा. फ्लैट नं ३०१, समर्थ हाईट्स, भाजी मंडई मागे, ओमसाई मंडळ जवळ, कात्रज, पुणे, ३) वसीम अब्दुल अजीज शाह, वय १९ वर्षे, रा. वनीता भानुदारा बलकवडे यांच्याकडे भाड्याने, आभास ईमारत, तिसरा मजला, साई स्नेहा हॉस्पीटल मागे, कात्रज गाव, कात्रज, पुणे, ४) दिपक रमेश सुतार, वय २५ वर्षे, रा. गल्ली नं ०१, दुगडचाळ, संतोषी माता मंदिर समोर, संतोष नगर, कात्रज, पुणे यांच्याकडे केलेल्या तपासादरम्यान पळून गेलेल्या आरोपीचे नाव सोहेल कुरेशी, रा. साहिल आनंद सोसायटी जवळ, येवलेवाडी, कोंढवा बु., पुणे असे असल्याचे निष्पन्न झाले सदर आरोपीतांचे पोलीस कस्टडी रिमांड दरम्यान अद्याप पर्यंत एकुण ०५ दुचाकी गाड्या, एक धारदार सत्तूर, व ०७ मोबाईल फोन असा एकुण ३,१३, २००/- रू किं चा मुद्देमाल हस्तगत करून कोंढवा पोलीस स्टेशन कडील

१) ६० / २०२३ भादंवि कलम ३९२, ५०६ (२), ३४.

२) ११६ / २०२३ भादंवि कलम ३९२ ५०६ (२). ३४.

३) २६ / २०२३ भा.दं.वि. कलम ३७९.

४) ०३ /२०२३ भा.दं.वि. कलम ३२४.

५) ४४ / २०२३ भा.दं.वि. कलम ३७९.

६) १०६२ / २०२२ भादंवि कलम ३७९

७) सासवड पोस्टे गु.र.नं. ७७/२०२३ भा.दं.वि. कलम ३९२.३४ सह भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५)

८) राजगड पोस्टे गु.र.नं. ५१ / २०२३ भादंवि कलम ३९५,५०६ (२), ३४

असे एकुण ०८ गुन्हे उघडकीस आणले आहेत. 

वरील नमुद कारवाई ही रितेश कुमार पोलीस आयुक्त, संदिप कर्णिक पोलीस सह आयुक्त, रंजन कुमार शर्मा अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, विक्रांत देशमुख पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ५, पौर्णिमा तावरे सहा.पोलीस आयुक्त वानवडी विभाग, संतोष सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा पोलीस स्टेशन, संजय मोगले पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील, पोलीस हवालदार / ११६१ सतिश चव्हाण, पोलीस हवालदार / ७९ निलेश देसाई, पोलीस नाईक / ८४८६ गोरखनाथ चिनके, पोलीस नाईक / ७७८२ जोतिबा पवार, पोलीस अंमलदार/ ८५९१ लक्ष्मण होळकर, पोलीस अंमलदार / ९८३८ संतोष बनसुडे, पोलीस अंमलदार / २१८५ सुजित मदन, पोलीस अंमलदार / ४९० सुरज शुक्ला व पोलीस अंमलदार / १०११६ ज्ञानेश्वर भोसले यांच्या पथकाने केली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील हे करीत आहेत.
कोंढवा पोलीस ठाण्याच्या सर्व पथकाचे पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments