Type Here to Get Search Results !

बिबवेवाडी पोलीसांची उत्तम कामगिरी ; मोक्का गुन्ह्यातील वाँटेड आरोपीस बिबवेवाडी पोलीसांनी टोकल्या बेडया...

बिबवेवाडी पोलीसांची उत्तम कामगिरी ; मोक्का गुन्ह्यातील वाँटेड आरोपीस बिबवेवाडी पोलीसांनी टोकल्या बेडया...

पुणे :- बिबवेवाडी पोलीस स्टेशनकडील गुन्हा रजि. नं. २२० / २०२२ भा.द.वि. कलम ३०७, ३८५, ३२३, ५०४, ५०६, ३४, सह भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५), महाराष्ट्र, पो. अधि.क.३७ (१), १३५, क्रिमीनल लॉ अॅमेंडमेंट ३,७ व मोक्का अॅक्ट कलम ३(i)(ii),३(२),३(४) गुन्हयातील पाहिजे आरोपी टोळीप्रमुख अनिकेत ऊर्फ अंडया विजय कोंढरे याचा बिबवेवाडी पोलीस स्टेशन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगिता जाधव व तपासपथक प्रमुख सहा. पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे, सहा. पोलीस उप निरीक्षक रविंद्र राऊत, अतुल महांगडे, शिवाजी येवले, प्रणय पाटील असे शोध घेत असताना दिनांक ०९/०२/२०२३ रोजी पोलीस अंमलदार अतुल महांगडे यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, नमुद पाहिजे आरोपी अनिकेत ऊर्फ अंडया कोंढरे हा त्रिमुर्ती चौक भारती विदयापीठ पुणे येथे येणार आहे अशी बातमी मिळाल्याने लागलीच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगिता जाधव यांचे दिमतीत, सहा. पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे तसेच स्टाफ मिळालेल्या बातमीचे ठिकाणी जावून सापळा रचून रात्रौ ०१.४५ वा. च्या सुमारास आरोपी अनिकेत ऊर्फ अंडया विजय कोंढरे वय २३ वर्षे रा. लोअर इंदिरानगर बिबवेवाडी पुणे. यास ताब्यात घेवून गुन्हयात अटक करण्यात आली आहे.

सदरची कारवाई ही अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, परिमंडळ ०५ पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख, वानवडी विभागाचे सहा.पोलीस आयुक्त पोर्णिमा तावरे, बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगिता जाधव यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक प्रविण काळूखे, पोलीस अंमलदार रविंद्र राऊत, अतुल महांगडे, शिवाजी येवले, प्रणव पाटील, अमोल नवले, सतिष मोरे, अभिषेक धुमाळ, संतोष जाधव यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments