महाराष्ट्र राज्य कारागृह अधिकारी व कर्मचारी वार्षिक क्रीडा स्पर्धांचे अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते उद्घाटन...
पुणे :- महाराष्ट्र कारागृह विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या राज्यस्तरीय वार्षिक क्रीडास्पर्धा दि 06 ते 09 फेब्रुवारी 2023 या दरम्यान पुण्यातील येरवडा येथील दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या स्पर्धांचे उद्घाटन सोमवारी अपर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य अमिताभ गुप्ता यांचे हस्ते झाले. यावेळी कारागृह विभागाचे उपमहानिरीक्षक स्वाती साठे, कारागृह उपमानिरीक्षक योगेश देसाई, प्राचार्य तुरुंग अधकारी प्रशिक्षण महाविद्यालय चंद्रमणी इंदुरकर, येरवडा कारागृह अधीक्षक शिवशंकर पाटील व राज्यातील विविध कारागृहांचे अधीक्षक व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
100 मीटर धावणे, 800 मीटर धावणे,रिंग टेनिस,गोळाफेक, लांब उडी, व्हॉलिबॉल, कबड्डी, कराटे, भालाफेक, 4×100 रिले, 400 मीटर धावणे, 200 मीटर धावणे, मॅटवरील कुस्ती, चालणे इत्यादि प्रकरच्या खेळांचा सदर स्पर्धेमध्ये समावेश आहे.
Post a Comment
0 Comments