Type Here to Get Search Results !

कसबा पेठ पोटनिवडणुकीत जनतेचा कौल रवींद्र धंगेकरांना असल्याचे चित्र...

कसबा पेठ पोटनिवडणुकीत जनतेचा कौल रवींद्र धंगेकरांना असल्याचे चित्र...
पुणे :- सध्या पुण्यात कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाची पोट निवडणूकीचे बिगुल वाजले आहे. या पूर्वी याठिकाणी भाजपचे मुक्ता टिळक हे आमदार होते. परंतु त्यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली आहे. यात अनेक पक्षांनी आपापल्या पद्धतीने उमेदवारांची मुलाखती देखील घेतले आहेत. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, एमआयएम, मनसे असे अनेक पक्ष उमेदवारांची चाचणी घेत आहेत. या निवडणुकीचे सर्वत्र पुणे शहरात चर्चा रंगली आहे. यातच काँग्रेस पक्षाचे नगरसेवक रविंद्र धंगेकर यांना निवडणूकी पूर्वीच आणि तिकीट मिळण्यापूर्वीच जनतेने निवडून देण्याचे ठरवले आहे. जनतेचा कौल त्यांच्या बाजूने असल्याचे चित्र सध्या कसबा पेठ मतदारसंघात दिसत आहे. असे सूत्रांकडून कळलेले आहे. धंगेकर सलग चार वेळा नगरसेवक म्हणून रविवार पेठ व त्या कसबा पेठ परिसरातील प्रभागातून निवडून आले आहेत. दोन वेळा शिवसेना एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना व आता काँग्रेस असा त्यांचा प्रवास आहे. त्यांची नागरिकांमध्ये एक चांगली छवी आहे. त्यांनी मागील काळात नागरिकांची अनेक कामे केलेली आहेत. जरी मतदारसंघातील नसेल तरी ते मदत करतात अशी त्यांची ओळख आहे.
या निवडणुकी बाबत त्यांच्याशी संवाद साधला असता. त्यांनी सांगितले की मी मागील 25 वर्षांपासून या ठिकाणी काम करतोय. आणि हे मतदारसंघ माझा संपुर्ण कुटुंब आहे. या ठिकाणी मी कोणत्याना कोणत्या कामात लोकांच्या संपर्कात आलेलो आहे. ह्या निवडणूकित मला काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळाली तर त्या संधीचे सोनं करेल आणि मी ते मतदारसंघात विकासासाठी प्रयत्न करेल, असे धंगेकर यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments