Type Here to Get Search Results !

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांचा वाढदिवस शिर्डी येथे अनाथालयात साजरा...

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांचा वाढदिवस शिर्डी येथे अनाथालयात साजरा...

शिर्डी :- राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांचा वाढदिवस 20 डिसेंबर रोजी असतो. दरवर्षी ते शिर्डी येथे वाढदिवस साजरा करतात. यावर्षी देखील त्यांचे सहकारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आमिर जेतपुरवाला यांच्या पुढाकाराने साई आश्रया परिवार ट्रस्ट शिर्डी येथे 100 पेक्षा अधिक अनाथ मुलांना अन्नदान, ब्लॅंकेट वाटप तसेच अनाथ आश्रमच्या परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी साई आश्रया परिवार ट्रस्टचे विश्वस्त गणेश दळवी यांनी धीरज शर्मा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व त्यांनी आभार व्यक्त केले. याकार्यक्रमात सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बिरारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहसीन शेख, जावेद ईनामदार, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा कोकण विभागीय अध्यक्ष किरण शिखरे, जानकी पांडे, रुपेश गायकवाड, न्यू युनिक फाउंडेशनचे अध्यक्ष मुज्जम्मील शेख, डॉ.रविकांत पांडे, रियाज शेख, दशरथ कुटे, शाबाझ शेख, सुयोग जाधव, दत्ता भालेराव, सचिन शिंदे, रजत महाडिक, सागर धुमाळ, आकाश गवळी व आदी उपस्थित होते.
                         वृक्षारोपण करताना...

Post a Comment

0 Comments