Type Here to Get Search Results !

पुण्यातून 2500 शिवसैनिक मुंबईला रवाना होणार ; शिवसेना उद्धव ठाकरे पुणे शहर प्रमूख संजय मोरे...

पुण्यातून 2500 शिवसैनिक मुंबईला रवाना होणार ; शिवसेना उद्धव ठाकरे पुणे शहर प्रमूख संजय मोरे...

पुणे :- 17 तारखेला होणाऱ्या महाराष्ट्र बंद साठी पुण्यातील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे 2500 कार्यकर्त्यांसह पुणे शहर प्रमुख संजय मोरे हे मोर्च्या मध्ये सामील होणार आहेत. 

काय बोलले संजय मोरे...
महाष्ट्राचं खच्चीकरण, महापुरुषांचा अपमान करणारे दिल्लीश्वरांचे लांगूलचालन, सीमाप्रश्नावरचा नेभळटपणा
शेतकऱ्यांविषयीची अनास्था आणि घटनाबाह्य सरकारचा मिंधेपणा ह्या विरुद्ध महाराष्ट्र विकास आघाडीचा विराट महामोर्चा मुंबईत रिचर्डसन अँड क्रुडास कंपनी, भायखळा ते आझाद मैदान सदर मोर्चासाठी पुणे शहरातील शिवसेनेचे 2500 शिवसैनिक, पदाधिकारी मुंबईकडे कूच करणार आहेत. कात्रज, फुरसुंगी, लोहगाव, हडपसर, धायरी, बावधन येथून बसने शिवसैनिक निघतील. अनेक शिवसैनिकांनी अगोदरच रेल्वे तिकीट बुकींग केल्यानुसार सिंहगड व डेक्कन क्वीनने जाणार आहेत. इतर पदाधिकारी चारचाकी गाडीने आपापल्या भागातून सकाळी 7 वा निघणार आहेत. यामधे शिवसेना पदाधिकारी, युवासेना, महिला आघाडी, युवती सेना, अंगिकृत संघटनेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने येणार आहेत.

Post a Comment

0 Comments