Type Here to Get Search Results !

मोहम्मद आझम मोहम्मद इलियास यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने सम्मानित...

मोहम्मद आझम मोहम्मद इलियास यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने सम्मानित...

टाईम्स ऑफ महाराष्ट्र (ब्युरो) :- पुणे जिल्हा परिषद उर्दू शाळा नारायणगाव क्र.३ येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले मोहम्मद आझम मोहम्मद इलियास यांना त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व प्राप्त प्रशस्तीपत्रांचे परीक्षण करून 
‘हैप्पी टू हेल्प’ सामाजिक व शैक्षणिक संस्था औरंगाबाद यांच्या तर्फे "राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार" जाहीर करून सन्मानित करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार, औरंगाबाद विभागाचे शिक्षक आमदार विक्रम काळे, उपजिल्हाधिकारी औरंगाबाद अंजली धानोरकर, उपायुक्त मनपा औरंगाबाद नंदा यादवराव गायकवाड तसेच शिक्षण खात्यातील सर्व अधिकारी यांच्या हस्ते मोहम्मद आझम यांना “राज्य आदर्श शिक्षक पुरुस्कार” देऊन गौरविण्यात आले आहे.
अनेक शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात सामिल करून त्यांना टिकवून ठेवणे, शिक्षण क्षेत्रात राबविलेले विविध उपक्रम, राज्य शासनाच्या शिक्षणाची वारी या उपक्रमा अंतर्गत सहा जिल्ह्यांमध्ये पुणे जिल्ह्याचा प्रतिनिधित्व, कोविड च्या काळात “शिक्षण आपल्या दारी” हा उपक्रम पुणे जिल्ह्यात सुरु करून गळतीचे प्रमाण शून्य करणे, विविध ई लर्निंग साहित्यांची निर्मिती व विद्यार्थ्यांसाठी त्याचा वापर, पाठ्यपुस्तक व्हिडीओ मेकिंग कमिटीचे प्रतिनिधित्व, विविध प्रकाशनाच्या पुस्तकांमध्ये लेखन, कृती पुस्तिका निर्मिती अशा अनेक उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन मोहम्मद आझम यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराकरिता निवड करण्यात आली व या पुरस्काराने त्यांना सम्मानित करण्यात आले. संपूर्ण राज्यातून या संस्थेद्वारे दरवर्षी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना गौरवण्यात येते. या वर्षी देखील डिसेंबर महिन्यात मौलाना आझाद रिसर्च सेंटर औरंगाबाद या ठिकाणी निवड झालेल्या मान्यवरांचा केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार व वरिष्ठ अधिकारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आला. या राज्य आदर्श शिक्षक पुरुस्काराकरिता निवड झाल्या बद्दल मोहम्मद आझम सरांचे त्यांच्या अधिकारी वर्ग, शिक्षक व मित्र मंडळी तर्फे सर्वच स्तरावर कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments