Type Here to Get Search Results !

सामाजिक कार्यकर्ते साकीब आबाजी यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत 24 तास डायलेसिस सेवा सुरू...

सामाजिक कार्यकर्ते साकीब आबाजी यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत 24 तास डायलेसिस सेवा सुरू...
पुणे :- काँग्रेस पक्षाचे धडाडीचे कार्यकर्ते व नगरसेवक रवींद्र धंगेकर यांचे विश्वासू समजले जाणारे साकीब आबाजी यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील झेड व्ही एम युनानी हॉस्पिटलमध्ये 20 तारखेपासून 24 तास डायलेसिस सेवा सुरू करण्यात आली. डायलिसिस सेवा सध्या पुण्यात अनेक शासकीय रुग्णालयामध्ये सुरू होती परंतु त्याचा वेळ निर्धारित काळापर्यंत होता. सलग पाच तास डायलेसिस एका माणसाला घेणे गरजेचे होते. पुण्यातील अनेक रुग्णालयात सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत डायलिसिस सेवा उपलब्ध होतील परंतु नागरिकांना 5 तास डायलेसिस सेवा घेणे कठीण जात होते. त्याच्याच अनुषंगाने साकीब आबाजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विचार केला आणि ही अत्यंत आवश्यक सेवा नागरिकांना उपलब्ध करून दिले. या सेवेमुळे नागरिकांना रात्री देखील याचा फायदा होत आहे. या सुविधेचा दोन दिवसात 40 पेक्षा अधिक नागरिकांनी लाभ घेतला आहे.
साकिब आबाजी हे नागरिकांच्या वैद्यकीय कामासाठी सतत पुढे असतात. मागे त्यांनी पुणे महानगरपालिका आरोग्य विभागाला एक दिवस टाळे ठोकले होते. साठी आबाजी हे दरवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त असे आगळ्या वेगळ्या कार्यक्रमांचा आयोजन करत असतात.  तसेच त्यांनी सांगितले की जनसेवा हीच ईश्वरसेवा म्हणून मी काम करतोय असेच मी काम करत राहणार आहे सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या. 

Post a Comment

0 Comments