Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

जी 20 परिषद पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात...

जी-20 परिषद पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात...

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात जी-२० शी निगडीत एका अर्थविषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. युवा-२० या कार्यक्रमासाठी विद्यापीठाची निवड झाली असून, केंद्रीय समित्यांनी या संबंधीची पाहणी पूर्ण केली आहे.

अधिसभेच्या बैठकीत कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी यासंबंधीची माहिती दिली. 
                👇👇👇 Advertisement👇👇👇
             👆👆👆 Advertisement👆👆👆

बुधवारी (ता.२८) नवनिर्वाचित सदस्यांच्या पहिल्या अधिसभेचे विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात आयोजन करण्यात आले होते. आपल्या भाषाणात कुलगुरुंनी जी-२० बैठकांतील विद्याीपीठाच्या सहभागासंबंधीची माहिती दिली. अर्थविषयक समितीची महत्त्वपूर्ण बैठक विद्यापीठात पार पडणार असून, समन्वय आणि नियंत्रणाशी निगडीत प्रोटोकॉल विद्यापीठाकडे असणार आहे.

हवामान बदलाची मध्यवर्ती कल्पना विद्यापीठाने स्विकारल्याचे कुलगुरूंनी स्पष्ट केले. जी-२० च्या निमित्ताने विद्यार्थी आणि नवउद्योजकांना फायद होईल, अशा कार्यक्रमांचे अधिक आयोजन करावे. तसेच विद्यापीठ स्तरावर कार्यक्रमांच्या आयोजनासाठी एक समिती स्थापन करावी, अशी सूचना अधिसभा सदस्यांनी केली. जी-२० परीषद समजून घेण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांसाठी विशेष व्याख्यान आयोजित करण्यात येणार असल्याचेही कुलगुरूंनी सांगितले.

Post a Comment

0 Comments