केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते दलित पँथरच्या वतीने शौर्य दिनानिमित्त बनविण्यात आलेल्या विजयस्तंभ रथाचे उद्घाटन...
पुणे :- दरवर्षी 1 जानेवारी रोजी भिमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त नागरिक लाखोंच्या संख्येने उपस्थित राहत असतो. त्याच्याच अनुषंगाने दलित पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष व आरपीआय महाराष्ट्र प्रदेश सचिव यशवंत नडगम यांच्या वतीने शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभ रथ बनविण्यात आले होते. या रथाचे उद्घाटन पुण्यातील खराडी बायपास येथे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले आणि भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष संतोष भरणे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी रामदास आठवले यांना दलित पॅंथर चे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत नडगम यांच्या वतीने सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच या रथामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा देखील बसविण्यात आले होती. या रथाचा उद्देश म्हणजे भीमा कोरेगाव विजयस्तंभा पर्यंत नागरिक पोहचू शकले नाही तर त्यांना या रथामध्ये असलेले विजयस्तंभ आणि बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करता येईल. या हेतूने दलित पॅंथरचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत नडगम यांनी यासाठी प्रयत्न केले होते. आणि या रथात असलेले विजायस्तंभाचे अनेक नागरिकांनी लाभ घेतला, आणि अभिवादन केले.
या उद्घाटन वेळी दलित पॅंथरचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्रीकांत लोणारे, महिला प्रदेशाध्यक्ष सुवर्णा नडगम, युवक प्रदेशाध्यक्ष संतोष गायकवाड, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष गणेश नायडू, महिला अध्यक्ष स्नेहा माने, सोलापूर जिल्हाध्यक्ष बंडू गवळी, पुणे शहराध्यक्ष आकाश पायाळ, युवक अध्यक्ष सनी पंजाबी, शबाना मुलानी, जॅक्सन एंथोनी, सनी कोरे, अविनाश मोरे, सुषमा कांबळे व आदी मान्यवर उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments