Type Here to Get Search Results !

टाईम्स ऑफ महाराष्ट्रच्या बातमीचा इफेक्ट ; लोणी काळभोर व विश्रांतवाडी परिसरातील मटका जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाकडून छापा (Raid)...

टाईम्स ऑफ महाराष्ट्रच्या बातमीचा इफेक्ट ; लोणी काळभोर व विश्रांतवाडी परिसरातील मटका जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाकडून छापा (Raid)...

पुणे :- मागील काही दिवसांपूर्वी टाइम्स ऑफ महाराष्ट्राच्या वतीने विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक मटके व अनेक अवैध व्यवसाय संदर्भात बातमी लावण्यात आली होती त्याचीच दखल घेता. पुणे शहरातील लोणी काळभोर व विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सुरु असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर पुणे शहर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला आहे. दोन ठिकाणी छापा कारवाई करुन 20 जणांना ताब्यात घेऊन 78 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सामाजिक सुरक्षा विभागाला सोमवारी (दि.21) लोणी काळभोर परिसरात पत्र्याच्या शेडमध्ये कल्याण मटका जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती मिळाली. पथकाने पाळत ठेवून जुगार अड्ड्यावर छापा टाकला. त्यावेळी 10 जणांना जुगार खेळताना ताब्यात घेण्यात आले. या कारवाई पोलिसांनी रोख रक्कम, मोबाईल, मटका जुगाराचे साहित्य असा एकूण 46 हजार 430 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.तसेच गुरुवारी (दि.24) विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पत्र्याच्या शेड मध्ये सुरु असलेल्या कल्याण मटका जुगार व पणती पोकळी सोरट जुगार अड्ड्यावर छापा टाकला.यावेळी जुगार खेळत आणि खेळवत असलेल्या 10 जणांना ताब्यात घेऊन 31 हजार 580 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींवर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णीक,अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील,अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाब कर्पे, अजय राणे, मनिषा पुकाळे, आण्णा माने, इरफान पठाण, संदीप कोळगे, पुष्पेंद्र चव्हाण व अमित जमदाडे यांच्या पथकाने केली.

Post a Comment

0 Comments