Type Here to Get Search Results !

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट) निवडणुकीचा निकाल जाहीर; महाविकास आघाडीला मोठ्ठा धक्का...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट) निवडणुकीचा निकाल जाहीर; महाविकास आघाडीला मोठ्ठा धक्का...

खुला प्रवर्ग वगळता अन्य पाच प्रवर्गाचे निकाल आतापर्यंत जाहीर: खुल्या प्रवर्गाची दुसऱ्या फेरीची मतमोजणी अद्यापही सुरू...

पुणे :- (संपादक मुज्जम्मील शेख), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीमध्ये एबीव्हीपी प्रणित विद्यापीठ विकास मंच पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे. विद्यापीठ विकास मंच पॅनलचे आत्तापर्यंत 7 उमेदवार या निवडणुकीत निवडून आले आहेत, यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सख्खे चूलत बंधू प्रसेनजित फडणवीस यांचाही समावेश आहे. खुल्या प्रवर्गातून प्रसेनजित फडणवीस यांना 4,447 मतं पडली, तर याच प्रवर्गातून 3,711 मतांसह सागर वैद्य हेदेखील विजयी झाले. सिनेट निवडणुकीमध्ये विद्यापीठ विकास मंचचे फडणवीस आणि वैद्य यांचा पहिल्याच फेरीत दणदणीत विजय झाला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेचे पाच प्रवर्गातील निकाल  मंगळवारी जाहीर सायंकाळी जाहीर करण्यात आले, दरम्यान खुल्या प्रवर्गातील दुसऱ्या फेरीची मतमोजणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

अनुसूचित जाती प्रवर्गातून राहुल पाखरे १३ हजार ५१२ मतांनी निवडून आले. अनुसूचित जमाती प्रवर्गातून १३ हजार ९९५ मते मिळवत गणेश नांगरे निवडून आले. निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती) भटक्या जमाती या जागेवर डॉ.विजय सोनवणे हे १४ हजार १०१ मतांनी निवडून आले आहे. इतर मागास वर्ग प्रवर्गातून सचिन गोर्डे पाटील हे १३ हजार ३४२ मतांनी निवडून आले आहेत. तसेच महिला प्रवर्गातून बागेश्री मंठाळकर १५ हजार ६४९ मतांनी विजयी झाल्या आहेत. 

खुल्या प्रवर्गातून विजयी झालेल्यांची यादी.
१ - प्रसेनजीत फडणवीस ४ हजार ४४७
२ - सागर वैद्य ३ हजार ७१

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची अधिसभेच्या दहा जागांसाठीच्या निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. सकाळी साडे आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. विद्यापीठातील तीनशेहून अधिक प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी यावर काम करत होते. उमेदवार व त्यांचे प्रतिनिधीही हजर होते.  ५०० सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही, संकेतस्थळावर थेट प्रक्षेपण आदींसह नियोजनबध्द पद्धतीने ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.

दरम्यान सर्व विजयी उमेदवारांचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, विशेष कार्याधिकारी प्रमोद भडकवाडे, निवडणूक अधिकारी डॉ.वैशाली साकोरे , ज्ञानेश्वर साळुंखे, प्रदीप कोळी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.


टीप ;- यामध्ये आणखीन अपडेट येणार आहे.

Post a Comment

0 Comments