पुणे :- येरवड्यातील गोल्फ चौक येथील उड्डाणपूलाचे 75 टक्के काम पूर्ण झाले असून, या वर्षी डिसेंबरअखेर तो वाहतुकीसाठी खुला केला जाईल, अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष माजी आमदार जगदीश मुळीक यांनी दिली.
मुळीक यांनी 9 ऑक्टोबर (बुधवारी) उड्डाणपूलाच्या कामाची पाहणी करून तो लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सूचना दिल्या. नवी खडकी गावाकडे जाणारा रस्ता खुला ठेवावा, असे त्यांनी सुचविले. अधीक्षक अभियंता सूष्मिता शिर्के,
कार्यकारी अभियंता अभिजीत आंबेकर, उप अभियंता संदीप पाटील,शाखा अभियंता रणजीत मुटकुळे, तज्ञ सल्लागार अमित मुनोतमाजी, नगरसेवक योगेश मुळीक, राहुल भंडारे, श्वेता गलांडे, मुक्ता जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.
नगर रस्त्यावर गुंजन चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, शास्त्रीनगर या भागात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते. ती नियंत्रणात आणण्यासाठी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष योगेश मुळीक यांच्या प्रयत्नातून हा उड्डाणपूल उभारण्यात येत आहे.
यावेळी संतोष राजगुरु, संतोष भरणे, गणेश देवकर, अन्वर पठाण, ज्ञानेश्र्वर शिंदे, सुनिल जाधव, किशोर वाघमारे, प्रताप मोहिते, धनंजय बाराथे, विकास सोनावणे, राजू जाधव, पुनाजी जगताप, सुभाष देवकर, गणेश गवारे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments