सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ निवडणूक संस्थाचालक गटात बिनविरोध निवड ; विद्यापीठाच्या निवडणुकीत विद्यापीठ विकास मंचाला मोठे यश...
पुणे :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा देशातील विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच संस्थाचालक गटातून अधीसभेवर विद्यापीठ विकास मंचाच्या पाच उमेदवारांची बिनविरोध निवड झाली.
संस्थाचालकांच्या खुल्या गटातून...
डॉ. राजेंद्र विखे-पाटील, डॉ.अपूर्व हिरे, प्रा. विनायक आंबेकर, श्री. अशोक सावंत यांची आणि महिला गटात डॉ. ज्योत्स्ना एकबोटे यांचा बिनविरोध उमेदवारांत समावेश आहे.
विद्यापीठ विकास मंचाचे समन्वयक राजेश पांडे यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.
पांडे म्हणाले, विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच संस्थाचालक गटात बिनविरोध निवडणूक झाली आहे. ही बिनविरोध होण्यासाठी विद्यापीठ विकास मंचच्या प्रयत्नांना यश आले आहे. डॉ गजानन एकबोटे, डॉ. राजेंद्र विखे पाटील, डॉ अपूर्व हिरे, प्रा. एन. डी. पाटील, डॉ. नितीन ठाकरे, डॉ संदीप कदम, अभाविपचे प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे यांनी त्यासाठी विशेष प्रयत्न केले.
Post a Comment
0 Comments