पुणे शहरातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्याच्या मुलीचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश...
पुणे :- राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू मानले जाणारे आणि पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते, माजी महापौर व प्रवक्ते अंकुश काकडे यांची कन्या मेघना काकडे - माने यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेमध्ये प्रवेश केला. पक्ष प्रवेशा दरम्यान शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, अनिल परब, सचिन आहिर, आदेश बांदेकर, सुषमा अंधारे. उपस्थित होते. मेघना काकडे-माने यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाबाबत अंकुश काकडे यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले आहे.
Post a Comment
0 Comments