Type Here to Get Search Results !

पुण्यातील कॅम्प भागात पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाची अवैध अतिक्रमणांवर "दबंग स्टाईल मध्ये" कारवाई...

पुण्यातील कॅम्प भागात पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाची अवैध अतिक्रमणांवर "दबंग स्टाईल मध्ये" कारवाई...
पुणे :- कॅम्प परिसरातील पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने पुणे शहर पोलिसांना समवेत घेऊन (१४ नोव्हेंबर) सोमवारी असंख्य अवैध अतिक्रमणे हटवण्यात आले. मागील काही दिवसांपासून पुणे शहर पोलीस आयुक्त यांची वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी सतत धावपळ दिसत होती. पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता व पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी संपूर्ण पुणे शहरात पाहणी केली होती. तसेच पुण्यातील कॅम्प भागात अनेक अवैध अतिक्रमणे असल्याकारणाने अंतर्गत रस्त्यांमध्ये वाहतुकीस खोळंबी होत होती. अनेक नागरिकांनी यावर तक्रार देखील दर्शविली होती.
त्याच्या अनुषंगाने पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्रत पाल यांच्या वतीने मुख्य आरोग्य अधिकारी आर.टी. शेख, प्रमोद कदम, संजय मखवाना कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा फौज फाटा घेऊन पोलिसांच्या बंदोबस्तात "दबंग स्टाईल" मध्ये कॅन्टोन्मेंट परिसरातील जान मोहम्मद स्ट्रीट, शिवाजी मार्केट आणि एमजी रोड असे अनेक ठिकाणी कारवाई करण्यात आली. तसेच मुख्य अरोग्य अधिकारी आर.टी.शेख यांनी सांगितले आहे की, आम्ही येत्या काळात आम्ही अवैध अतिक्रमणावर कारवाई सुरू ठेवणार आहोत.
या कारवाईत लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे यांच्या टीम ने कारवाई केली आहे.
या कारवाईवर काहींनी नाराजी व्यक्त केली तर, अनेकांनी याची प्रशंसा देखील केलेली आहे.

Post a Comment

0 Comments