Type Here to Get Search Results !

पोलीस निरीक्षकाने केली आत्महत्या ; राज्यात पोलीस दलात उडाली खळबळ...

पोलीस निरीक्षकाने केली आत्महत्या ; राज्यात पोलीस दलात उडाली खळबळ...
धुळे येथे पोलीस निरीक्षकाने गळफास लावुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना (दि.15) मंगळवारी घडली आहे. या घटनेमुळे धुळे पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडालेली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील पोलीस निरीक्षक प्रविण कदम यांनी गळफास लावुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. प्रशिक्षण केंद्रातील शासकीय निवासात गळफास असून आत्महत्येचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस यंत्रणा घटनास्थळी पोहचलेली होती, घटनास्थळ पंचनामा करुन निरीक्षक प्रविण कदम यांचा मृतदेह शवविच्छे, दानासाठी हिरे शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक प्रवीण कदम हे गेल्या तीन वर्षांपासून धुळे येथे नियुक्त होते. या घटनेमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments