Type Here to Get Search Results !

आझाद समाज पार्टी व भीम आर्मी तर्फे रुबी हॉल हॉस्पिटल समोर बेमुदत धरणे आंदोलन...

आझाद समाज पार्टी व भीम आर्मी तर्फे रुबी हॉल हॉस्पिटल समोर बेमुदत धरणे आंदोलन...
पुणे :- रुबी हॉल क्लिनिक समोर आझाद समाज पार्टी व भीम आर्मी तर्फे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले. काही दिवसांपूर्वीच किडनी रॅकेट मध्ये चर्चेत असलेले रुबी हॉल हे आता पुन्हा एकदा वादात सापडले आहे. अनेक नागरिकांच्या या हॉस्पिटल बाबत  तक्रारी समोर आल्या आहेत. हॉस्पिटल मध्ये धर्मदाय आयुक्तांकडून नियुक्त करण्यात आलेले समाजसेवक पूनम चौहान आणि रुबी हॉलचे बिलिंग हेड मनोज श्रीवास्तव हे गोरगरीब नागरिकांना धर्मदाय अंतर्गत लाभ मिळवून देत नसल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. त्यातच आता आजाद समाज पार्टीचे पुणे शहराध्यक्ष भीमराव कांबळे यांनी देखील आंदोलनाच्या माध्यमातून काही प्रश्न आणि मागण्या केल्या आहेत. 
त्यामध्ये रुबी हॉल क्लिनिक धर्मादाय नोंदणीकृत असूनही न्यास नियमाप्रमाणे अंमलबजावणी नाही. आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना वैधानिक राखीव बेड उपलब्ध होत नाही. रुबी हॉल क्लिनिक इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट नाही. रुबी हॉल क्लिनिकचे कित्येक वर्षापासून सोशल ऑडिट नाही. या कारणासाठी अंदालन घेतले आहे. तसेच त्यांनी रुबी हॉल क्लिनिक मधील सोशल वर्कर पुनम चौहान आणि बिलिंग हेड मनोज श्रीवास्तव यांच्या अरेरावीच्या व रुग्णांना अडकाठी आणणाऱ्या भूमिकेबद्दल त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांना कार्यमुक्त करावे. धर्मादाय न्यास प्रमाणे राखीव खाटा दुर्बल घटकांना उपलब्ध करून द्याव्यात. रुबी हॉल क्लिनिकचे तात्काळ सोशल ऑडिट व इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे. रुबी हॉल क्लिक चे किडनी रॅकेट प्रकरणी सीबीआय व सखोल चौकशी व्हावी अशा मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन घेतले आहे. व त्यांनी सांगितले आहे की, जर ह्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही येत्या चार दिवसानंतर आक्रमक स्वरूपाचे आंदोलन करून अख्या महाराष्ट्राला याबाबत जागृत करणार आहोत. असे त्यांनी सांगितले आहे. सदर आंदोलनाचे नेतृत्व अशरफ खान किशोर वाघमारे व निखिल पवार करत आहे. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष स्वाती गायकवाड, पुणे शहर महिला आघाडी अध्यक्ष अर्चना केदारी यांनी मनोगत व्यक्त केले. आंदोलनामध्ये प्रमुख उपस्थिती भीम आर्मी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सिताराम गंगावणे व आझाद समाज पार्टी वकील सेलचे अध्यक्ष तोसिफ शेख व महाराष्ट्र प्रदेश आजाद समाज पार्टी फिरोज मुल्ला, महासचिव राजन नायर व संघटक एडवोकेट क्रांती सहाने, जिल्हा महासचिव रेखा जाधव व शिवाजीनगर मतदारसंघ अध्यक्ष संदीप शेंडगे, आकाश घोडके, सुजित म्हस्के, योगेश अवचरे व अनेक महिला व कार्यकर्ते यावेळी आंदोलनांमध्ये उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments