Type Here to Get Search Results !

कोंढव्यातील एकता सोशल कमिटी यांच्याकडून दिपावली साजरी...

कोंढव्यातील एकता सोशल कमिटी यांच्याकडून दिपावली साजरी...

पुणे :- कोंढवा पोलीस स्टेशन येथे कोंढवा भागातील मुस्लिम युवक एकता सोशल कमिटी यांच्याकडून 22 ऑक्टोबर शनिवारी पोलिसांसोबत दिवे लावून दिपावली साजरी करून हिंदू - मुस्लीम एकतेचे प्रतीक कोंढाव्यात दिसून आले. यावेळी कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील व आदी अधिकारी उपस्थित होते. तसेच कोंढवा भागातील महावितरण विभागाचे कार्यलयात देखील दिवे लावून दिवाळीचे शुभेच्छा देण्यात आले.
याकार्यक्रमाचे नियोजन एकता सोशल कमिटीचे लियाकत शेख, शहबाज पंजाबी, साकिब शेख, बिलाल इनामदार व इतर सदस्य हजर होते. सदर वेळी कोंढवा भागातील मुस्लिम बांधवांनी एकत्याचा संदेश दिला असून त्यांच्या या कार्याला सर्वांकडून कौतुक केले जात आहे.

Post a Comment

0 Comments