Type Here to Get Search Results !

सायबेजखुशबू गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणार…

सायबेजखुशबू गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणार…

अर्ज करण्याची अंतिम तारिख : ३१  ऑक्टोबर, २०२२ 

अभियांत्रिकी, वैद्यकिय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती कार्यक्रम जाहीर...

पुणे :- सायबेजखुशबू तर्फे या वर्षीही पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना  शिष्यवृत्ती दिली जाणार आहे . आजवर संस्थेने १८०० पेक्षा अधिक हुशार, गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृती दिलेली आहे व या वर्षी देखील गुणवंत विद्यार्थी या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेऊ शकतील. सायबेजखुशबू ही सायबेज सॉफ्टवेअर कंपनीची सामाजिक काम करणारी व “शिक्षणातून सामर्थ्य” या संकल्पनेवर विश्वास ठेवणारी संस्था आहे. गरजू, गुणवंत आणि पात्र विद्यार्थ्यांना त्यांची शैक्षणिक स्वप्ने पूर्ण करून त्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी ट्रस्ट २००९ पासून सातत्याने मदत करीत आहे. हे काम असेच चालू ठेवत संस्था या वर्षी सुद्धा सामाजिक व आर्थिक दृष्ट्या दुर्बल  परंतु गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृती देणार आहे. प्रामुख्याने अभियांत्रिकी, वैद्यकिय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी उदा. बीई, डिप्लोमा, बी.सी.ए, एम.सी.ए, बी.बी.ए, आर्किटेक्चर, एम.बी.बी.एस, बी. डी.एस., फार्मसी, नर्सिंग, होमिओपॅथी, फिजिओथेरेपी,  इ. शिक्षणासाठी आजपर्यंत संस्था शिष्यवृत्ती देते व यंदाच्या वर्षीही देणार आहे. ११ वी १२ वी, बीए, बीकॉम, बीएससी व परदेशातील शिक्षण यासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार नाही.

दरवर्षी, जे विद्यार्थी ग्रॅज्युएट आणि पोस्टग्रॅज्युएट कोर्स करू इच्छितात त्या लाभार्थींना कोर्स पूर्ण होईपर्यंत शिष्यवृत्ती बहाल करण्यात येते. यावर्षी देखील सायबेजखुशबू संस्था विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागवत आहे.

अर्जदारांसाठी निकष:

ज्या विद्यार्थ्यांना १० वी व १२ वी परिक्षेत ६०% पेक्षा अधिक गुण आहेत, ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे आर्थिक वार्षिक उत्पन्न ४ लाखापेक्षा कमी आहे आणि ज्यांना त्यांच्या गुणवत्तेच्या आधारावर महाविद्यालयात प्रवेश मिळणार आहे असे पुणे जिल्ह्यातील रहिवासी  विद्यार्थी या शिष्यवृत्ती साठी अर्ज करू शकतात.

या शिष्यवृत्ती साठी चे अर्ज ऑनलाईन स्वरुपात भरावे लागणार आहेत. खालील लिंक वर जाऊन विद्यार्थी ऑनलाईन अर्ज भरू शकतात. http://www.cybagekhushboo.org

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी असलेली लिंक  ३१ ऑक्टोबर, २०२२  पर्यंत खुली राहणार आहे.

संस्थेची माहिती देताना संचालिका सौ. रितू नथानी म्हणाल्या की, "सायबेजखुशबू संस्थेचा असा विश्वास आहे की प्रतिभा समाजाच्या सर्व स्तरात आहे पण या प्रतिभेला योग्य संधी मिळत नाही. आर्थिकदृष्ट्या वंचित परंतु होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत करणे व त्या अनुषंगाने आपल्या देशामध्ये असणारी विषमता दूर करणे हे सायबेजखुशबूचे उद्दीष्ट आहे. आर्थिक सहाय्याबरोबर सायबेजखुशबू संस्था आपल्या लाभार्थींच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कौशल्य प्रशिक्षण प्रदान करण्यावर देखील लक्ष केंद्रित करते. गेली तेरा  वर्षे सायबेजखुशबू विद्यार्थ्यांना मदत करत आहे व यावर्षी देखील हा शिष्यवृत्ती कार्यक्रम जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे.

आजपर्यंत १८०० पेक्षा जास्त लाभार्थी संस्थेशी जोडले गेले आहेत. संस्थेने मदत केलेल्या काहींना Bank of America, Inforsys, Microsoft, Amazon, Accenture, TCS, Crompton Greaves, HSBC अशा नामवंत कंपन्यानमधे नोकरी मिळाली आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :

राकेश कांबळे - ७४४७४२४६३१ 

अमोल टकले – ७०३८५३६९४८

अर्ज करण्याची अंतीम तारिख ३१ ऑक्टोबर, २०२२.

ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक :  http://www.cybagekhushboo.org

सायबेज सॉफ्टवेअर प्रा. लि. बद्दल:
सायबेज सॉफ्टवेअर ही सॉफ्टवेअर उत्पादन क्षेत्रात सल्लागार म्हणून सेवा पुरवणारी एक नावाजलेली कंपनी  आहे. कंपनीच्या सर्व सेवा या अत्याधुनिक तंत्र व शास्त्रीय विश्लेषण याच्या आधारे पुरवल्या जात असून या सर्व सेवांची गुणवत्ता मूल्यमापन करून वेळोवेळी पडताळलेली असते. आठ हजारहून अधिक गुणवान कौशल्यपूर्ण तंत्रज्ञांच्या या कंपनीचे मुख्यालय पुणे येथे असून हैद्राबाद आणि गांधीनगर येथेही कंपनीची केंद्रे आहेत. नॉर्थ अमेरीका, UK, युरोप, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर आणि जपान इथे कंपनीची आंतरराष्ट्रीय ऑफिसेस आहेत. सायबेज सॉफ्टवेअर ही Media & Entertainment, Travel & Hospitality, Online Retail, Healthcare & Life Sciences, and Technology  अशा काही महत्वाच्या क्षेत्रात प्रामुख्याने काम करते. सातत्याने परिपूर्ण सेवांचा पुरवठा, संगणक क्षेत्रातील ज्ञान आणि वेगवेगळ्या देशात होणाऱ्या विस्तारामुळे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्वाची कंपनी म्हणून सायबेज ओळखली जाऊ लागली आहे. अधिक माहितीसाठी आमची वेबसाईट : www.cybage.com वर माहिती घेऊ शकता.

Post a Comment

0 Comments