Type Here to Get Search Results !

Add

Add

पुणे एनजीओ फेडरेशनच्या वतीने महिलांसाठी मीना बाजार व मुस्लिम वधुवर सूचक मेळाव्याचे आयोजन...

पुणे एनजीओ फेडरेशनच्या वतीने महिलांसाठी मीना बाजार व मुस्लिम वधुवर सूचक मेळाव्याचे आयोजन...

पुणे :- गेली दोन वर्षांपासून कोरोना व महामारीमुळे अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागला आहे. त्यातच अनेक लोकांचे रोजगार गेले. अशातच पुण्यातून अनेक संघटना लोकांच्या मदतीसाठी धावून आल्या जशी जमेल ती मदत केली. अशा विविध संघटनांचा सत्कार पुणे एन जी ओ फेडरेशनच्या वतीने करण्यात आला. त्याच बरोबर या कार्यक्रमात महिलांसाठी मीना बाजार चे आयोजन यास्मिन शेख याच्या वतीने करण्यात आले. तसेच खुद्दाम ए मिल्लत मॅरेज ब्युरो मार्फत मुस्लिम वधुवर सूचक मेळाव्याचे देखील आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात कोंढव्यातून १८ संघटनांनी सहभाग घेतला यावेळी कार्यक्रमाचे आयोजक माजी स्वीकृत सदस्य हसीना इनामदार व समाजसेवक हाजी फिरोज शेख तसेच पश्चिम महाराष्ट्र एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष जुबेर राशिद खान यांचे हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच फेडरेशनचे अध्यक्ष रियाज मुल्ला यांना या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या आणि कार्यक्रमाचे कौतुक केले त्याचबरोबर समाजसेवक हाजी फिरोज शेख यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करत लवकरच बेरोजगारांसाठी नोकरी महोत्सव घेणार असल्याचे सांगितले. त्याच बरोबर या फेडरेशनला शुभेच्छा देत आपण सोबत काम करण्याचे आश्वासन दिले. तर जुबैर खान यांनी फेडरेशनचे अध्यक्ष मुल्ला आणि सहकाऱ्यांचे आभार मानले त्याचबरोबर महिलांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमात पत्रकार नदीम इनामदार, वाजिद खान व रहीम सय्यद यांचा सत्कार करण्यात आला. कोरोना विषयी जण जागृती करणारे बंडू विवेक सरपोतदार व योगेश सरपोतदार यांचा देखील सत्कार करण्यात आला. यावेळी  फेडरेशनचे अध्यक्ष रियाज मुल्ला यांनी आलेल्या पाहुण्यांचे व संघटनाचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रोफेसर चांद शेख यांनी केले तर या कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी फैसल शेख रिश्तेवाला, शहेबाज पंजाबी, शमीम खान पठाण, झाकिया खान, खिसाल जाफरी, अय्याज खान यांनी प्रयत्न केले.

Post a Comment

0 Comments