Type Here to Get Search Results !

महाराष्ट्रात लवकरच होणार 18000 जागांसाठी पोलीस भरती...

राज्यात लवकरच होणार 18000 जागांसाठी पोलीस भरती...
पुणे :- राज्यात काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस भरती करणार असल्याचे सांगितले होते. त्यातच आता महाराष्ट्रातल्या पोलीस भरतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. शासनाकडून पोलीस भरतीचा जीआर काढण्यात आला आहे. शासनाच्या जीआर द्वारे तब्बल 11 हजार 443 पदे भरली जाणार आहेत. महाराष्ट्र पोलिसांची रिक्त असलेली 100 टक्के पदे भरण्याला मान्यता देण्यात आली आहे.
राज्यातील पोलीस खात्यामध्ये पोलीस शिपाई वर्गामध्ये पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक आणि सशस्त्र पोलीस शिपाई अशी एकूण 11 हजार 443 पदं भरली जातील. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी कक्षेतील पदं वगळता अन्य पदं 50 टक्के पद भरण्यास राज्य शासनाकडून परवानगी देण्यात आली आहे.

राज्याच्या पोलिस दलात रिक्तपदे वाढली असून सततचा बंदोबस्त आणि वाढलेल्या गुन्हेगारी खटल्यांचा तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या पार्श्वभूमीवर आता 2020 आणि 2021 मधील तब्बल 19 हजार 758 रिक्तपदांची दोन टप्प्यात भरती होईल.
उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, येत्या आठवडाभरात 18, 000 हजार पोलीसांच्या भरतीची जाहिरात निघणार आहे. मुख्यमंत्र्यांनी इतर विभागांना आदेश दिलेले आहेत की, ज्या कोणत्या विभागांमध्ये जागा रिकाम्या असतील त्या जागांचा रिपोर्ट तयार करावा आणि विभागानुसार लवकरच नोकरीची जाहिरात काढावी, यामुळे अजून इतर वेगवेगळ्या विभागातील जाहिराती निघण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिनाभरापूर्वी पोलिस भरतीची घोषणा केली होती. राज्यात साडेसात हजार पदांसाठी लवकरच पोलिस भरती प्रक्रिया राबवणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं. तसेच गृह विभागाचे सचिव आणि इतर अधिकाऱ्यांना तातडीने भरती प्रक्रिया राबवण्यासाठी सूचना दिल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते.

Post a Comment

0 Comments