औरंगाबाद : अत्याचार भ्रष्टाचार विरोधी अभियानाचे महाराष्ट्र प्रमुख सय्यद साबीर यांच्या वतीने राज्यातील वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या सत्कार मूर्तींचे औरंगाबाद येथे मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आले. या कार्यक्रमात पुण्यातील पत्रकार मुज्जम्मील शेख यांना संजय मैत्रेवार प्रादेशिक परिवहन अधिकारी व औरंगाबादचे माजी महापौर रशीद मामु यांच्या हस्ते राज्यातील उत्कृष्ट युवा पत्रकारितेकरिता समाज भुषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी माजी अप्पर पोलीस अधीक्षक कलंदर शेख, डॉ. चौधरी सर, एड. संगीता भट्टड, ठाण्याचे माजी नगरसेवक मनोज भाऊ, अनवर बैग, राष्ट्रवादी युवा किसान संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष सोहेल शेख, सीडीसी उद्योग समूहाचे संचालक मुजाहिद राज, मुबशीर शेख व आदी उपस्थित होते.
👇👇 For Advertisement👇👇
👆👆 For Advertisement👆👆
Post a Comment
0 Comments