Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

मंडल यात्रेेचा उत्साहात समारोप1990 च्या दशकात मंडल चळवळीसाठी काम करणार्या कार्यकर्तांचा झाला सन्मान...

मंडल यात्रेेचा उत्साहात समारोप1990 च्या दशकात मंडल चळवळीसाठी काम करणार्या कार्यकर्तांचा झाला सन्मान...
नागपूर:  ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी विद्यार्थ्यांना ‘मंडल आयोगाबाबत जागृती करीत त्यांना त्यांचे अधिकार आणि हक्क समजावून सांगण्यासाठी ‘मंडल दिनानिमित्त विदर्भातील सात जिल्ह्यात 1 आँगस्ट रोजी काढण्यात आलेल्या मंडल यात्रेचा आज मंडल दिनी रविवार 7 आँगस्ट रोजी समारोप झाला.यानिमित्ताने सेवादल महाविद्यालय सक्करदरा(नागपूर) येथे आयोजित कार्यक्रमात मंडलआयोगाची जाणिव जागृती विदर्भात करुन देणारे वरिष्ट सामाजिक कार्यकर्ते यांचा स्मृतीचिन्ह देऊन आयोजकांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष इंजि.प्रदिप ढोबळे म्हणाले की , आपली लढाई ही फुले शाहू आंबेडकर पेरीयार कांशीराम य़ांच्या विचारांची लढाई असून ओबीसींच्या हितासाटी ज्या दिवशी मंडल आयोगाची घोषणा झाली तो मंडल दिवस म्हणजे ओबीसी समाजाच्या स्वांतत्र्याचा खरा दिवस असल्याचे विचार ओबीसी सेवासंघाचे अध्यक्ष इंजि.प्रदिप ढोबळे यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना व्यक्त केले.
आमच्या न्यायहक्काची यात्रा म्हणजे मंडल यात्रा होय या यात्रेशिवाय आमच्या विकासाची दुसरी यात्रा नाही हे ओबीसीनी जानूण घेणे काळाची गरज झाली आहे.

समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष इंजि.प्रदीप ढोबळे होते. तर स्वागताध्यक्ष म्हणून सेवादल महिला महाविद्यालयाचे अध्यक्ष संजय़ शेंडे उपस्थित होते.मंचावर उमेश कोराम, डॉ. ज्ञानेश्वर गोरे, बळीराज धोटे,  प्रा. ज्ञानेश वाकुडकर, दिनानाथ वाघमारे,नितेश कराडे, बेरार टाईम्सचे संपादक खेमेंद्र कटरे, अशोक लंजे,  प्रफुल्ल गुल्हाने,श्रावण फरकाडे, प्रा.रमेश पिसे, डॉ़एऩ.डी़.राऊत, अ‍ॅड. डॉ.अंजली साळवे,विलास काळे,ईश्वर बाळबुध्दे, ज्ञानेश्वर रक्षक,संध्याताई सराटकर, गोपाल सेलोकर, भैय्याजी लांबट, पंकज पडोळे,प्रा.अनिल डहाके आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना ढोबळे म्हणाले या देशातील जातीय व्यवस्था बदलणे  आवश्यक असून सामाजिक समता बहुजनामध्ये स्थापन करुन सामाजिक न्याय स्थापन करावे लागणार आहे.परंतु सध्या ओबीसींचे आरक्षण हिरावून घेण्यासाटी खासगीकरनाच सपाटा देशातील राजसत्तेने चालवले आहे हे युवकांनी लक्षात घेत भुलथाप्यांना बळी पडू नये असे म्हणाले. सविंधान संपवण्याचे काम सध्या सुरू असून ते वाचविण्याचे काम करावे लागेल.सविंधान वाचले तरच सामाजिक न्याय मिळणार आहे.मंडल आयोग ज्यादिवसापासून लागू झाला त्या दिवसापासून आम्हाला आरक्षण मिळायला हवे होते मात्र तसे झाले नाही ही आमच्यासाटी भेदभाव करणारी टरली.तामिळनाडूमध्ये ओबीसीना ५० टक्के आरक्षण मिळू शकतो तर महाराष्ट्रात का नाही यावर बोलताना ढोबळे म्हणाले दक्षिणेतील ओबीसी अधिकारासटी जागृत झाला मात्र पुरोगामी महाराष्ट्राचा ओबीसी मंडल यात्रेऐवजी इतर यात्रेकडे वळविला गेल्याने त्यांचे नुकसान झाले हे सत्य नाकारता येणारी नाही.ओबीसी या देशातील श्रमव्यवस्था आहे. 
प्रत्येक टिकाणी आमचा हिस्सा वाटा राहिला पाहिजे मग ते नोकरी असो कि मंदिरे हे समजून घेत अधश्रध्देतून समाजाला बाहेर काढावे लागणार आहे.
ही मंडल य़ात्रा मॉडेल टरणारी असून पुढच्या वर्षी देशभर या काळातच कशी निघेल याचे नियोजन करावे लागेल असेही म्हणाले.
स्वागताध्यक्ष शेंडे म्हणाले की ओबीसी आरक्षणाच्या माध्यमातून मुळापर्यंत जाऊन तो हिसकावून घेण्याचा प्रयत्न राहणार आहे.मात्र मंडल यात्रेने गावागावापर्यत पोचून जे काम केले त्यामुळे ओबीसींना वास्तविक परिस्थीतीच जाणिव करुन समाजाला प्रामाणिकपणे जागृत करण्याचे काम य़ा यात्रेतून खर केले आहे.प्रस्थापितानी आता ओबीसी न्याय हक्कासाटीजागृत झाला हे समजून घेतले पाहिजे असे म्हणाले.जातनिहाय जनगणना करुन वसतीगृह सुरु झालेच पाहिजे यासाटी हा आपला लढा मंडल यात्रेतून सुरु करण्यात आले आहे असे शेंडे म्हणाले.
दिनानाथ वाघमारे यांनी यात्रेच्या संयोजनाबद्दल माहिती देत आत्ता कृती कार्यक्रमाच्या माध्यमातून ओबीसींच्या न्याय मागण्यासाटी आंदोलनात्मक भूमिका जाहिर करावी लागणार आहे.

सत्कारमुर्ती नागेश चौधरींनी मंजल चळवळीचा इतिहासाची माहिती देत म्हणाले की सत्ता भाजपची असो की इतर कुणाची त्यांच्यामागे असलेली जी आरएसएसची शक्ती आहे ती शक्ती तुमची जनगणना सरकारने केली तरी आकडे समोर येऊ देईल की नाही हे तुम्हाला समजून घ्यावे लागेल राजकीय सत्ता ही सामाजिक सत्ता होऊ शकत नाही हे लक्षात जाणून घ्या.आम्ही या देशाचे बहुजन ओबीसी मालक आहोत हे समजून घेतले पाहिजे.प्रत्येक ओबीसी बहुजनांच्या संघटना वेगवेगळ्या असून प्रत्येकाचा इगो असल्याने आम्ही विभागले गेलो याचाच लाभ ते घेतात आणि आम्ही संघटित होण्याऐवजी विभाजित होत गेल्याने शक्तीचे प्रर्दशन दाखवू शकलो नाही असे म्हणाले.हा लढा सामाजिक व सॉंस्कृतिक आहे.


ज्ञानेश्वर गोरे म्हणाले की,सर्वसंघटनांची कृती समन्वय समिती तयार करुन आंदोलनाची दिशा टरवण्याची गरज आहे.महात्मा फुले सत्यशोधक विद्यापीटाच्या माध्यमातून मुलांना विचार देण्यासाटी आम्ही कटीबध्द आहोत ओबीसी युवकांनी स्वयस्फुर्तीने समोर यावे असे म्हणाले.

ज्ञानेश वाकुडकर बोलताना म्हणाले की,संसदेने स्पष्टपणे ओबीसींची जनगणना करायला नकार दिल्यानंतरही त्याना आम्ही का त्याना मंचावर संधी देतो असे म्हणत आत्ता शक्तीच तुम्हाला दाखवावे लागेल तेव्हाच तुम्हाला न्याय मिळेल.आमची जनगणना नाही तर आमचे मत नाही अशी भूमिका घ्यावी लागेल.आपला माणूस नव्हे तर आपला विचारांचा माणूस निवडून आला तरच समाजाला न्याय मिळेल हे महत्वाचे आहे.स्वत:ची राजकीय ताकद तयार करावे लागेल तेव्हाच ओबीसीना न्याय़ मिळेल असेही विचार त्यानी व्यक्त केले.
बळीराज धोटे यावेळी म्हणाले की,देशाचे नवनिर्माण करणारा आपला समाज आहे़.देशाचा पोषण करणारा बळीराजा आत्महत्या करतोय ही शोकांतिका असून सत्ताधारी मात्र त्यावर राजकारण करीत असल्याची टिका केली.राजकीय पक्षांच्या ओबीसीसेलनी गप्प बसण्यापेक्षा आवाज उटवणे गरजेचे आहे.ओबीसीवर आत्ता कुटे बोलायला लागल्याने सरकारचेही लक्ष कधीकधी असते.लोकशाही पध्दतीने आम्हाला गावागावात जाऊन काम करावे लागेल.चळवळीत चमकोगिरी करणारा कार्यकर्ता नको त्यामुळे चळवळ भटकत असल्याचे आजपर्यंतचा इतिहास आहे.

नितेश कराडे म्हणाले कधीपर्यंत २७ टक्याच्या झुनझुना हातात घेऊन स्वत:चे समाधान करुन घेणार.ज्यांच्यासाटी आपण हे करतोय तो ओबीसी विद्यार्थी आज कुटाय त्याला या मंडल आयोगाची माहिती द्यावी लागेल.जे वसतीगृह द्यायला पाहिजे ते तर दिले नाही ७२ केले पण ते सुध्दा कागदावरच राहिले हीच सरकारची उपलब्धी म्हणावी लागेल.राजकारणात चुकीचे लोक शिरल्याने आज राजकारण वाईट झाले असले तरी चांगले लोक यात गेलेच पाहिजे असे कराडे म्हणाले.
यात्रेचे सयोंजक उमेश कोराम म्हणाले की,गावागावात जाऊन ओबीसींच्या समस्या व प्रश्नांची जाणिव करुन घेण्यासाटी ही यात्रा होती तसेच विद्यार्थ्यांशी सवांद साधून मंड आयोग आपला हिताचा पटवून देणे हा मुख्य उद्देश होता.जातनिहाय जनगणनेसाटी आमचा लढा सुरू राहणार आहे.तसेच वसतिगृहासाटी आंदोलनात्मक भूमिका घेणार आहोत असे कोराम म्हणाले.
प्रा.रमेश पिसे म्हणाले की राजकीय स्वरुपाचे प्रश्न राजकीय पटलावरच सुटू शकतात.आपली माणस न्यायपालिकेसह सर्वच पातळीवर आले पाहिजेत. २७८ खासदार बहुजनसमाजातील असताना प्रश्न का सुटू शकत नाहीत याचा विचार करावा लागेल.
 अंजली साळवे महिलांना सुध्दा सामाजिक आरक्षणाची व नेतृत्वाची गरज आहे हे विसरुन चालणार नाही म्हणून महिलांनीही मोट्या संख्येने सहभागी व्हायला हवे असे म्हणाल्या.

 
यावेळी  सत्कारमुर्ती म्हणून  नागेश चौधरी, प्रा.नामदेवराव जेंगठे, प्रा.श्याम झाडे, भाऊराव राऊत, शैल जैमीनी,यामीनी चौधरी, सुनिता काळे, संध्या राजुरकर, नुतन माळवी, सध्या सराटकर,छाया कुरूकटर, पांडुरंग काकडे, गोविंद वरवाडे, डॉ. गुरुदास येडेवार, अशोक चोपडे, विजय बाभुळकर, यशवंत सराटकर, अनुल हुलके आदिंचा सत्कार शाल श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.समारोप कार्यक्रमाला ओबीसी बहुजन चळवळीतील बंधु-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आयोजनासाठी  ओबीसी युवा अधिकार मंचचे उमेश कोर्राम,खेमेंद्र कटरे,दिनानाथ वाघमारे,मुकुंद आडेवार,धिरज भिसीकर,संजीव भुरे, पियुष आकरे,वंदना वनकर,प्रा.अनिल डहाके,कैलास भेलावे,कृतल आकरे,राजेश्वरी कोंपले,सुदर्शना गभणे,तनिष्का नागोसे,स्वाती अडेवार ,रंजना सुरजुसे आदिंनी सहकार्य केले.प्रास्तविक मुकुंद अडेवार यांनी केले. तर संचालन संतोष मालेकर व वंदना वनकर यांनी केले तर आभार  खेमेंद्र कटरे   यानी मानले.कार्यक्रमाची सुरवात राष्ट्रगिताने व शेवट सविंधान उद्देशिका वाचनाने करण्यात आली.

Post a Comment

0 Comments