मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सेल व सर्व विभाग कार्यकारिणी बरखास्त करण्यात आले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संमतीनुसार पक्षातील सर्व विभाग आणि सर्व सेल बरखास्त करण्यात आल्याची घोषणा करण्यात आल्याचं एक पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यालयाने या माहितीला दुजोरा दिला आहे.
सोशल मीडियावर पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रफुल्ल पटेल यांच्या सहीच पत्र सोशल मीडियात व्हायरल होत आहे. त्यामध्ये पक्षाचे सर्व विभाग आणि सेल बसखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं आहे. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या संमतीने हा निर्णय घेण्यात आल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.
राष्ट्रवादी लागली निवडणुकीच्या तयारीला ?
निवडणुकीपुर्वी राष्ट्रवादी काँग्रेस कामाला लागली असून, त्याचाच एक भाग म्हणून पक्षाचे सगळे सेल देखील बरखास्त करण्यात आले आहेत. पक्षाच्या या पदांवर लवकरच नवीन नियुक्त्या होण्याची शक्यता आहे. या बरखास्तीचे पत्र पक्षाच्या सगळ्या सेलच्या प्रमुखांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव प्रफुल्ल पटेल यांच्याकडून पाठवण्यात आलं आहे.
पक्षाचे पदाधिकारी देखील लागले कामाला...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील आपापल्या पद्धतीने जवळीक नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केले आहेत. लवकरच नवीन कार्यकारणी देखील जाहीर होणार असल्याचे सूत्रांकडून कळालेले आहे. त्या कारणामुळे पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते देखील कामाला लागलेले आहेत.
Ncp Body Dissolve...
All the cells and divisions of NCP party were dissolved on the order of National President Sharad Pawar...
Post a Comment
0 Comments