Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

बारामती ट्रेकर्स क्लबचा चौथा वर्धापनदिन उत्साहात संपन्न...

बारामती ट्रेकर्स क्लबचा चौथा वर्धापनदिन उत्साहात संपन्न
बारामती : सह्याद्री हा फक्त महाराष्ट्रातील नाही तर भूतलावरील  अद्भुत ठेवा आहे. सह्याद्रीतील प्रत्येक झाडं, फुल, फळ, प्राणी नद्या नाले या जगातील सर्वोत्तम आणि विलक्षण आहे. आपन भाग्यवान आहोत असा ठेवा आपल्या महाराष्ट्राला लाभला आहे. त्याचे जतन करणे हे फक्त शासनाचे नाहीतर प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे मत प्रसिद्ध पर्यावरण अभ्यासक व पत्रकार अभिजीत घोरपडे यांनी व्यक्त केले आहे. ते बारामती येथे बारामती ट्रेकर्स क्लब च्या चौथ्या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने बोलत होते...

यावेळी बोलताना ते आपण ट्रेकिंग करत असताना फक्त टाईमपास म्हणून न करता पर्यावरणाची आवड जोपासली पाहिजे. पर्यावरणातील होणारे बदल हे मानवासाठी धोकादायक आहे. त्यामुळे निसर्ग संवर्धन करायचे असल्यास आधी त्याबद्दल आवड निर्माण होने गरजेचे आहे. आणि त्यासाठी निसर्गवाचन आणि त्याचा अभ्यास ही गोष्ट महत्वाची आहे.

या कार्यक्रम प्रसंगी पर्यावरण अभ्यासक डॉक्टर महेश गायकवाड हे आवर्जून उपस्थित होते. त्यांनी उपस्थित ट्रेकर्स व तरुणांना मार्गदर्शन केले. डॉ. महेश गायकवाड यांनी स्थानिक वृक्षप्रजातीची होणारी वृक्षतोड ही धोकादायक आहे. तर नवीन वृक्षारोपण करताना देखील स्थानिक प्रजातीची झाडें न लावल्यामुळे स्थानिक प्राणी,पक्षी, कीटक, सरपटणारे प्राणी यांच्या प्रजनन प्रक्रियेवर देखील गंभीर परिणाम होतं आहे. यामुळे आपल्या जैवविविधतेवर गंभीर परिणाम होतं आहे. अतिशय ओघवत्या शैलीत निसर्ग संवर्धनाच महत्व व्यक्त केले.

या कार्यक्रमात बारामती ट्रेकर्स ग्रुप चे फोटोग्राफरं ऋतुराज काळकुटे व राहुल जगताप यांचा त्यांनी ट्रेक दरम्यान केलेल्या नर्सग फोटोग्राफी साठी विशेष सन्मान करण्यात आला.यावेळी अमोल जी काटे, सुधीर पानसरे प्रताप आबा पागळे. आदी मान्यवर उपस्थित होते  पदमकांत निकम, प्रशांत राजपुरे , प्रशांत ढवळे , विकास गायकवाड, सौरभ घाडगे व बारामती ट्रेकर्स क्लबच्या सर्व सदस्यांनी कार्यक्रम उत्साहात पार पाडण्यासाठी सहभाग घेतला या वर्धापन प्रसंगी ऍड हरिष कुंभरकर , शशांक मोहिते, विपुल पाटील, नायब तहसीलदार तुषार बोरकर, बारामती ट्रेकर्स क्लब चे अध्यक्ष ऍड.सचिन वाघ, मच्छिन्द्र टिंगरे आदींनी मनोगत व्यक्त केले झाली. प्रस्तावना ऍड. योगेश वाघ यांनी केली व  सूत्रसंचालन ऍड. राहुल झाडे तर आभार प्रशांत पवार यांनी मानले...

Post a Comment

0 Comments