पुणे :- (मुज्जम्मील शेख) पुण्यातील सरदार वल्लभभाई पटेल छावणी सामान्य रुग्णालयामध्ये 2020 मध्ये लागलेल्या आगीत शस्त्रक्रिया गृह जळून खाक झाले होते. त्यानंतर रुग्णांना इतर खासगी रुग्णलयांचे आधार घ्यावा लागत होता.
तसेच कॅन्टोन्मेंट बोर्डाची आर्थिक स्थिती खराब असल्याने शस्त्रक्रिया गृह पुन्हा बनवणे शक्य होत नव्हते.
तर रुग्णालयाच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ उषा तपासे, डॉ महेश दळवी, डॉ उदय भुजबळ आणि डॉ निखिल यादव यांनी प्रयत्न करून CYBAGE सॉफ्टवेअर कंपनी यांच्याकडून 1 कोटी 62 लाख रुपये इतक्या किमतीचे मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर बनवून घेतले.
या शस्त्रक्रिया गृह तसेच सुधीर साबळे व रोटरी क्लब ऑफ पूना डाऊन टाऊन यांनी दिलेल्या रुपये 27 लाख रुपये या रकमेतून उभारलेल्या शस्त्रक्रिया पश्चात कक्ष , इतर शस्त्रक्रिया साठी लागणारे साहित्य यांचे लोकार्पण केजेएस चौहान महा निदेशक दक्षिण कमान, रितू नथानी संचालक सायबेग आशा ट्रस्ट , सुधीर साबळे व पल्लवी साबळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी रितू नथाणी यांनी त्यांचे पती अरुण नथानी व त्यांनी छोट्या सदनिकेत सुरू केलेल्या उद्योगाचे मोठ्या स्वरूपात रूपांतर झाल्याचे सांगितले, तसेच त्यांच्या सायबेग आशा ट्रस्ट द्वारे करण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. ब्रिगेडियर भूपेश गोयल यांनी या हॉस्पिटल मधील डॉक्टर तसेच इतर निमवैद्याकिय कर्मचाऱ्यांचे ते करीत असलेल्या कामाबद्दल कौतुक केले. केजेएस चौहान महानिदेशक रक्षा संपदा दक्षिण कमान यांनी या प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा छावणी रुग्णालयात उपलब्ध केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. येथे करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रिया पैकी 75% महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत मोफत करण्यात येणार असून त्यामुळे रुग्णाची मोठी सोय होणार आहे. मॉड्यूलर ऑपरेशन थिएटरमुळे शस्त्रक्रिया दरम्यान जंतुसंसर्गचे प्रमाण अतिशय कमी होईल तसेच शल्यचिकित्सक यांना काम करणे सोपे होणार आहे.
याप्रसंगी निदेशेक संजीव कुमार, अमोल जगताप, प्रसाद चव्हाण, नामनिर्देशित सदस्य सचिन मथुरावाला, कर्नल विलास सावळगे आदी उपस्थित होते. याप्रसंगी हॉस्पिटलला देणगी किंवा मशिनरी देणाऱ्या 40 दात्यांचे सत्कार करण्यात आले.
यामध्ये प्रामुख्याने सायबेगचे जयकृष्णन, अब्बास भाई कादर भाई अब्दुजी ट्रस्ट, क्रेडिट SUISSE, कन्सर्न इंडिया फाउंडेशन, टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेड, प्रकाश धोका गुरुद्वारा गुरू नानक दरबार पुणे कॅम्प, रोटरी क्लब, वेकफिल्ड व आदींचा सत्कार करण्यात आला.
Post a Comment
0 Comments