Type Here to Get Search Results !

मुन्नव्वर कुरेशी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाज उपयोगी कार्यक्रमांचे आयोजन...

मुन्नव्वर कुरेशी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाज उपयोगी कार्यक्रमांचे आयोजन...
पुणे : वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहर अध्यक्ष व इंडियन मुस्लिम फ्रंटचे संस्थापक अध्यक्ष मुन्नव्वर कुरेशी यांचा एक जुलै रोजी वाढदिवस असता त्यांच्या कार्यकर्त्यांनी व सहकारी यांनी वेगवेगळे समाज उपयोगी कार्यक्रमांचा आयोजन केले होते. त्यामध्ये हडपसर येथे लहान मुलांच्या आश्रम मध्ये खाऊवाटप व शालेय वस्तू वाटप, कॅम्प मध्ये आरोग्य तपासणी शिबिर व नाडी परीक्षण शिबिर असे अनेक वेगळ्या स्वरूपाचे सामाजिक उपक्रम राबविले होते. दरवर्षी कुरेशी यांच्या वाढदिवसानिमित्त असेच अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. मागील दोन वर्षांपासून वाढदिवस साजरा न करता कोरोना काळात अनेक गरजूवंतांना मदत करण्यात आली होती. वाढदिवसाचा वायफट खर्च न करता हा खर्च समाजासाठी वापर करावा ही कुरेशी यांची संकल्पना आहे. 
तसेच आरोग्य शिबिरामध्ये नाडी परीक्षण करण्यासाठी अनेक स्थानिक नागरिकांनी याचा फायदा घेतला. या शिबिरामध्ये नाडी परीक्षण करण्याकरिता डॉक्टर जतीन जैन, डॉ अर्चना सरकाले, रजनी दरेकर यांनी नागरिकांची तपासणी केली. या कार्यक्रमाचे आयोजन फय्याज सय्यद, नासिर शेख यांनी केले होते. यावेळी पत्रकार मुज्जम्मील शेख देखील उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments