Type Here to Get Search Results !

कोंढाव्यातील कोहिनुर रैना सोसायटीच्या वतीने रोजा ईफ्तार पार्टीचे आयोजन...

कोंढाव्यातील कोहिनुर रैना सोसायटीच्या वतीने रोजा ईफ्तार पार्टीचे आयोजन...
पुणे :- कोंढाव्यातील लुल्लानगर येथील कोहिनूर रैना सोसायटी मध्ये जातीय सलोखा जपत एक आगळा वेगळा रोजा इफ्तार पार्टीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गेल्या सलग 1 महिन्यापासून सुरू केलेला हा कार्यक्रमाला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तसेच त्यांनी 28 एप्रिल (गुरुवारी) पोलीस, पत्रकार, समाजसेवक व इतर क्षेत्रातील मान्यवर यांना या कार्यक्रमात आवर्जून बोलवण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून कोंढवा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश तोडमल व पत्रकार मुज्जम्मील शेख हे होते तसेच सोसायटीच्या वतीने प्रमुख मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.
कोहिनूर रैना ही सोसायटी काहीच महिन्यांपूर्वी सुरू झाली आहे. आणि सोसायटी सुरू झाल्यानंतर हा पहिलाच रमजान महिना आहे. आणि पहिल्याच वर्षी सोसायटीतील नागरिकांनी या कार्यक्रमाला अत्यंत चांगला प्रतिसाद नोंदविला आहे.
या कार्यक्रमाचे सर्वस्वी आयोजन सोसायटीचे चेअरमन नूर अरब, उप चेअरमन कुतूबुद्दीन सय्यद, खजिनदार अजीम खान, सचिव बरकत काद्री, सलीम बागवान, नासीर शेख, ऍड.गुलामहुसेन खान, ऍड.इम्रान हासमानी, फिरोज सय्यद, मोहम्मद खान, निहाल खान, तनवीर क्षेख, नईम शेख, आफ्रीन खान, अबीदा खान व आदींनी केला होता.

Post a Comment

0 Comments