पुणे :- काही दिवसांपूर्वीच काँग्रेस पक्षाचे चिंतन शिबीराचे कार्यक्रम उदयपूर येथे संपन्न झाले होते. या कार्यक्रमाला दिग्गज पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमात पुढील ध्येय आणि उद्दिष्टे यावरती ही बैठक संपन्न झाली होते. या कार्यक्रमामध्ये पक्षाच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्ष व तसेच एक परिवार एक पद असे देखील निर्णय घेण्यात आले होते. परंतु महाराष्ट्रात याउलटच पहायला मिळाले. विधान परिषदेचे आमदार डॉ. वजाहात मिर्झा यांच्याकडे एक सोडून तीन तीन पदे सोपविण्यात आलेले आहे. आमदार वजाहात मिर्झा हे सध्या महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचे चेअरमन आहेत. तसेच विधानपरिषदेचे आमदार देखील आहेत. तसेच आता त्यांना काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पद देण्यात आले आहे. यावरून लक्षात येतंय की, काँग्रेस पक्षाकडे नेतृत्व नसल्याने उघड झालेले आहे. पक्ष एक निर्णय घेतोय आणि त्यावर काहीच अमलात येत नसल्याचे देखील पाहायला मिळत आहे. या गोष्टीवर आम्ही काही काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला असता त्यापैकी काही कार्यकर्त्यांनी सांगितले की, आम्ही कार्यकर्ते फक्त सतरंज्या उचलायलाच आहेत. कार्यकर्त्यांना कुठेही बळ देण्याचे काम पक्ष करत नसल्याचं आम्ही पाहतोय. आम्ही लवकरच वेगळे निर्णय घेणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.
यावरून आपल्याला समजत आहे की, पक्षाला येत्या निवडणुकीत मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागणार आहे. तसेच काही पदाधिकारी व कार्यकर्ते पक्ष सोडून देखील जाण्याचे चिन्ह यातून पाहायला मिळत आहे. चिंतन शिबिर संपल्याबरोबर काँग्रेसचे बडे नेते गुजरातचे कार्याध्यक्ष हार्दिक पटेल तसेच पंजाबचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील झाकड यांनी पक्षाला रामराम करत पक्ष सोडला होता. आता असेच चित्र महाराष्ट्रात उधभवते का असे चित्र सध्या पक्षाचे दिसत आहेत.
Post a Comment
0 Comments