Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

समीर वर्तक यांनी घेतली राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट...

समीर वर्तक यांनी घेतली राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट...
महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री तथा भारतीय राष्ट्रीय
काँग्रेसचे विधिमंडळ नेते ना. बाळासाहेब थोरात यांची बुधवारी (दि.१९) काँग्रेस पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष समीर वर्तक यांनी भेट घेऊन आपल्या पर्यावरण विभागाचा कार्य अहवाल
सादर केला. यावेळी त्यांच्यासोबत पर्यावरण विभागाचे प्रदेश सचिव अभिजीत घाग हेही उपस्थित होते. मागील अनेक वर्षांपासून वसईतील जनतेला भेडसावत असलेल्या विषयांवर चर्चा करण्यात आली. ज्यामध्ये प्रामुख्याने वसई विरार शहरात अल्पसंख्याक समाजासाठी कब्रस्तान व दफनभूमीची समस्या, अनेक वर्षांपासून रखडलेली ६९ गावांची पिण्याच्या पाण्याची योजना, महानगरपालिकेची स्वतःची परिवहन सेवा आणि
एस.टी. महामंडळाची सेवा तसेच आयआयटी व निरी या संस्थांच्या अहवालाप्रमाणे बुडणाऱ्या वसईचे नियोजन इ. समस्यांबाबत समीर वर्तक यांनी माहिती देऊन मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा केली.

Post a Comment

0 Comments