Type Here to Get Search Results !

ज्ञानज्योती फातिमाबी शेख जयंतीनिमित्त ऑनलाइन कवीसंमेलनाचे कार्यक्रम संपन्न...

ज्ञानज्योती फातिमाबी शेख जयंतीनिमित्त ऑनलाइन कवीसंमेलनाचे कार्यक्रम संपन्न...

पुणे :- ९ जानेवारी सोमवारी फातिमाबी शेख यांच्या जयंतीनिमित्त ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था , महाराष्ट्र राज्य, शाखा वैराग व हेल्पिंग हँडस् फाउंडेशन, हेल्पिंग हँडस् काव्य स्पर्धा मंच, सप्तरंगी कला अविष्कार, तडवळे (या), तालुका बार्शी जिल्हा सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन झूम ऍपवर सायंकाळी ७.०० वाजता भव्य काव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. सदर काव्यसंमेलनाचे उद्घाटन क्रांतीज्योती सावित्रीमाईच्या स्रीशिक्षणाच्या पवित्र कार्यात झोकून देऊन त्यांचे पवित्र कार्य जगासमोर आणण्यासाठी प्रयत्न करणा-या नामवंत कवयित्री , फातिमामाई या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाच्या संपादिका अनिसा सिकंदर शेख (सचिव, ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था, महाराष्ट्र राज्य) यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  कविवर्य खाजाभाई बागवान यांनी केले. अध्यक्षपद सुप्रसिद्ध कवयित्री, लेखिका,  प्राध्यापिका डॉ. आरिफा गालिब शेख (अरब, व भारत या देशात हिंदी व मराठी विषयाचे ज्ञान मुलांना देत आहेत) यांनी भूषविले अध्यक्षीय भाषणातून त्यांनी सावित्रीमाई फुले व फातिमामाई यांच्या शैक्षणिक कार्यावर प्रकाश टाकला त्या म्हणाल्या की,  गुगलने डुडल वरून  फातिमाबी शेख यांना प्रकाशझोतात आणले . आणि संशोधकांचे लक्ष वेधले 'देर आये दुरुस्त आये ' या वाक्प्रचारानुसार इथून पुढे अंधारात असलेल्या फातिमाबी शेख यांना नक्कीच न्याय मिळेल अशी तीव्र आशा व्यक्त केली. व इस्लामच्या इक्रा या तत्वानुसार शिक्षण किती महत्वाचे आहे हे त्यांनी सहेतू पटवून दिले. कार्यक्रमाचे अप्रतिम सूत्रसंचालन सुप्रसिद्ध कवयित्री साधना सुरेश घाटगे, मोहोळ यांनी करुन कार्यक्रमात रंगत आणली. या कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था, महाराष्ट्र राज्य या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व मुस्लिम मराठी साहित्य चळवळीचे शिल्पकार सर्वांचे मार्गदर्शक दीपस्तंभ मा. कविवर्य जनाब शेख शफी बोल्डेकर, बोल्डा, जिल्हा हिगोली यांनी केले. तसेच आभारप्रदर्शनाची धूरा सुप्रसिद्ध कवयित्री निलोफर फणिबंद यांनी सांभाळली. संकलन यादी व लिंक सौजन्य कवी मोहिद्दीन अकबर नदाफ ,अध्यक्ष,ग्रामीण  मुस्लिम मराठी साहित्य संस्था, शाखा वैराग, समुह प्रमुख, हेल्पिंग हँडस् काव्य स्पर्धा मंच, तडवळे (या), तालुका बार्शी जिल्हा सोलापूर यांनी पार पाडले. सदरहू काव्यसंमेलनात कवी मोहिद्दीन नदाफ, कवयित्री धनश्री वलेकर, शेख जाफर राजेसाहेब, कवयित्री शबाना मुल्ला, कवी गणेश जगदाळे, कवी युसुफ शेख, कवयित्री तहसिन मसुद अली, कवयित्री आयेशा नदाफ, कवयित्री अनिसा शेख, कवी शेख शफी बोल्डेकर, कवयित्री दिलशाद सय्यद या कवी-कवयित्रींनी युगस्री ज्ञानज्योती  फातिमामाई शेख यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणा-या स्वलिखित अप्रतिम कवितांचे सादरीकरण करुन श्रोते रसिकांची मने जिंकून घेतली.

Post a Comment

0 Comments