पुणे शहर AIMIM पक्षाच्या वतीने पत्रकारांचे सन्मान...
पुणे :- पुणे शहर AIMIM पक्षाच्या वतीने मागे झालेल्या पत्रकार दिनानिमित्त 28 जानेवारी (शुक्रवारी) उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पत्रकारांचे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. हा कार्यक्रम पुणे स्टेशन येथील बाबासाहेब आंबेडकर भवन येथे पार पडला.
हलीमा कुरेशी (बीबीसी मराठी), मोहिनी मोहिते (दैनिक सकाळ), शब्बीर मुजाहिद (हमनवा हिंदी वृत्तपत्र), मजहर खान (सजग नागरिक टाइम्स), एडवोकेट राशीद सिद्दिकी (वरिष्ठ पत्रकार), मुज्जम्मील शेख, (मुख्य संपादक टाईम्स ऑफ महाराष्ट्र), बसित पटेल व मुबशीर शेख या सर्व पत्रकारांना जुन्नर नगरपरिषदेचे विद्यमान नगरसेवक जमीर खान कागदी, डॅनियल लांडगे व अजीम गुडाकुवाला यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मुख्तार अहमद, AIMIM पक्षाचे पुणे शहर युवक अध्यक्ष शाहिद शेख, कार्याध्यक्ष निनाद धेंडे, उपाध्यक्ष मुबिन खान, सरचिटणीस साबीर शेख, महिला सेलच्या उपाध्यक्ष सुमय्या पठाण, अमरीन पालकर, अल्ताफ शेख, माजिद शेख, मन्सूर शेख, फयाज कुरेशी, शाहिद युनूस, फयाज खान, रोशनी शेख, डॉक्टर जमीन मोमीन, गुलशन आपा व आदी उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments