Type Here to Get Search Results !

राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागात नवीन कार्यकर्त्यांना संधी मिळणार - सलीम सारंग

राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागात नवीन कार्यकर्त्यांना संधी मिळणार - सलीम सारंग
पुणे - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे निरीक्षक सलीम सारंग यांनी राज्यात दौरा सुरू केला आहे. यामध्ये काही जिल्ह्यात दौरा पूर्ण झाला आहे. त्या जिल्ह्यातील पक्षाची ताकत दिसून येत आहे. यामध्ये आता नवीन युवक कार्यकर्त्यांना देखील नवीन प्रकारे संधी देणार असल्याचं सारंग यांनी सांगितले आहे. तसेच त्यांनी पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांची दिल्लीत भेट घेतली असून, त्यांनी केलेल्या दौऱ्याची संपूर्ण माहिती शरद पवार व सुप्रिया सुळे यांना दिली आहे. त्यांच्या या भेटीत बऱ्याच विषयांवर चर्चा झाली आहे.
तसेच येत्या काही दिवसांत अल्पसंख्याक विभागातर्फे शरद पवार साहेब, अजितदादा पवार, सुप्रियाताई सुळे, जयंत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन उपक्रम देखील राज्यात राबवणार असल्याचे सारंग यांनी सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments