पुणे :- स्वारगेट पोलीस स्टेशन कडील सहा.पोलीस निरीक्षक रसाळ, पो उप निरी जायभाय व पो.शि सोमनाथ कांबळे व संदिप साळवे यांना पो स्टे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना पो.शि सोमनाथ कांबळे, पो.शि संदीप साळवे यांना मिळालेल्या माहितीवरून स्वारगेट पो.स्टे. गु.र.नं. 286/2018 भा.द.वि. कलम 324,452,504,506,143,144,147,148,149 मधील 3 वर्षापासून पाहिजे असलेला आरोपी नामे सिंकदर उर्फ चिकु समद्दीन शेख, वय 31 वर्षे, रा. 429/30, डायसप्लाॅट, गुलटेकडी, पुणे हा एकोपा गार्डन या ठिकाणी येणार असल्याची त्यांच्या गुप्तबातमीद्वारे बातमी मिळाली त्यानुसार त्यास ताब्यात घेवुन दाखल गुन्हा बाबत अधिक चौकशी करता दाखल गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपीवर खंडणी, खुनाचा प्रयत्न, जबर दुखापत यासारखे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी ही, सागर पाटील पोलीस उपआयुक्त परिमंडळ ०२ पुणे शहर, सर्जेराव बाबर सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे शहर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर , सोमनाथ जाधव पोलीस निरीक्षक (गुन्हे ) स्वारगेट पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली व सुचनेनूसार स्वारगेट पोलीस स्टेशन तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोउपनि सुरेश जायभाय, पोहवा सचिन कदम, विजय कुंभार, विजय खोमणे, सोमनाथ कांबळे, संदीप साळवे,लखन ढावरे, सचिन दळवी,ज्ञाना बडे, मनोज भोकरे, वैभव शीतकाल, शंकर गायकवाड, ऋषिकेश तिटमे यांच्या पथकाने कामगीरी केली आहे.
Post a Comment
0 Comments