Type Here to Get Search Results !

अर्थसंकल्प 2021 - 22 ; काय आहे खास ? वाचा सविस्तर...

अर्थसंकल्प 2021 - 22 ; काय आहे खास ? वाचा सविस्तर...
संपूर्ण देशाचं लक्ष लागलेला अर्थसंकल्प 2021-22 (Union Budget 2021) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी संसदेत सादर केला असून अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचाही हा तिसरा अर्थसंकल्प आहे. तसंच पहिल्यांदाचा पेपरलेस बजेट सादर केलं जात असून मेक इन इंडिया टॅबचा वापर केला. आरोग्य क्षेत्रासाठी तिप्पट तरतूद करण्यात आलेली असून महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा केली आहे. नाशिक मेट्रोसाठी २०९२ कोटी तर नागपूर मेट्रोसाठी ५९७६ कोटींची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. मात्र इनकम टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.


 बजेटमधील महत्वपूर्ण तरतुदी :-
 • राष्ट्रीय रेल्वे योजनेसाठी १ लाख १० हजार कोटींची तरतूद

 • सरकारी बँका सक्षम करण्यासाठी २० हजार कोटी रुपयांच्या भांडवलाची तरतूद

 • परवडणाऱ्या घरांना ३१ मार्च २२ पर्यंत कर सवलत

 • नाशिक मेट्रोसाठी २०९२ कोटी तर नागपूर मेट्रोसाठी ५९७६ कोटींची तरतूद

 • जुन्या वाहनांसाठी 'स्क्रॅपिंग पॉलिसी' जाहीर- २० वर्षांनी खासगी वाहनांसाठी तर व्यवसायिक वाहनांची १५ वर्षांनी फिटनेस टेस्ट होणार

 • विदेशी गुंतवणुकीची मर्यादा ४९ टक्क्यांवरून वाढवून ७४ टक्के करणार

 • गुंतवणूक वाढवण्यासाठी कॉर्पोरेट करात कपात

 • तामिळनाडू, केरळ आणि आसाममध्ये महामार्गांच्या कामांसाठी मोठी तरतूद

 • पश्चिम बंगालमधील महामार्गांसाठी २५ हजार कोटी रुपयांची तरतूद

 • मुंबई-कन्याकुमारी महामार्गासाठी ६४ हजार कोटींची तरतूद

 • दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीच्या शहरात गॅस पाइपलाइनचा विस्तार करणार

 • भुपृष्ठ वाहतूक मंत्रालयासाठी १.१८ लाख कोटी रुपयांची तरतूद

 • कापड उद्योगासाठी मेगा टेक्सटाइल इन्व्हेस्टमेंट पार्क्स

 • कोविड लसीकरणासाठी ३५ हजार कोटी

 • नवीन आरोग्य योजनांवर ६४ हजार कोटी

 • जल जीवन मिशन योजनेसाठी दोन लाख ८७ हजार कोटींची तरतूद

 • कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी १ लाख ७८ हजार कोटींचा निधी

 • जम्मू काश्मीरमध्ये गॅस पाइपलाइन प्रोजेक्ट

 • सर्व क्षेत्रांमध्ये किमान वेतन कायदा

 • असंघटित मजुरांसाठी ऑनलाइन पोर्टल तयार करणार

 • शेतमालाला दीडपट हमीभाव देण्याचं सरकारचं उद्दीष्ट

 • गव्हाचं उत्पादन घेणाऱ्या ४३ लाख शेतकऱ्यांचा फायदा

 • सरकारी बँकांसाठी २० हजार कोटींची तरतूद

 • एलआयसी कंपनीचा आयपीओ बाजारात येणार

 • १०० नवे सैनिक स्कूल उभारणार

 • पहिली डिजीटल जणगणना करण्यासाठी तीन हजार ६८ कोटींची तरतूद

 • २०२०-२१ मध्ये वित्तीय तूट जीडीपीच्या ९.५ टक्के

 • डिजिटल व्यवहारास चालना देण्यासाठी केंद्र सरकराने १५०० कोटींची तरतूद

 • चार नव्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीची स्थापना करणार

 • गोव्याला ३०० कोटी रुपयांचा निधी

 • अर्बन क्लिन एअर मिशनसाठी १.४१ लाख कोटी रुपयांची तरतूद

 • १०० नवे सैनिक स्कूल उभारणार

 • आरोग्य क्षेत्राला संजीवनी ; प्रत्येक जिल्ह्यात होणार अत्याधुनिक लॅब

 • ७५ पेक्षा जास्त वय असलेल्यांना आयटी रिटर्नपासून मुक्ती

 • राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत १५ हजार शाळांमध्ये गुणात्मक सुधारणार होणार

 • टॅक्स ऑडिटची मर्यादा पाच कोटींवरुन १० कोटींवर

 • जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांसह टेक्स्टाईल पार्कची निर्मिती

 • मोबाइलच्या सुट्ट्या भागांना २.५ टक्के कस्टम ड्युटी.
          Times Of Maharashtra

Post a Comment

0 Comments