Type Here to Get Search Results !

विद्यार्थी काँग्रेसचे विद्यापीठाच्या सर्व परिक्षा ऑनलाईन घेण्यासाठी निवेदन...

विद्यार्थी काँग्रेसचे विद्यापीठाच्या सर्व परिक्षा ऑनलाईन घेण्यासाठी निवेदन...

कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे सर्व शैक्षणिक संस्था अध्यापनासाठी बंद होत्या . विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी ऑनलाईन अध्यापन पध्दतीचा वापर करुन विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात आले . मात्र आत्ता परिक्षा ऑफलाईन पध्दतीने घेण्यात येणार असल्याचे समजल्याने एनएसयुआयने विरोध दर्शवित या परिक्षा आॕनलाईनच घेण्यात याव्या अशी मागणी प्रदेशाध्यक्ष अमिर शेख यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु यांना निवेदन देत केली आहे.

यात नमूद आहे कि अध्ययन पध्दत ऑनलाइन असेल तर परिक्षा सुध्दा ऑनलाईन पध्दतीनेच घेण्यात यावी. पूर्ण देशामधील बहुतांश विद्यापीठांनी या सत्राची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतलेली आहे, तसेच महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर व इतर विद्यापीठाने अश्याच प्रकारे परीक्षा घेतलेल्या आहेत. या सर्व बाबींना अनुसरून ऑनलाइन पद्धतीने पुणे विद्यापीठाने सुद्धा परीक्षा घाव्यात जेणे करून विद्यार्थ्यांचे नुकसान कुठल्याच प्रकारे होणार नाही.

Post a Comment

0 Comments