Type Here to Get Search Results !

Add

Add

अबबब... थाळी संपवा आणि बुलेट घेऊन जा...

अबबब... थाळी संपवा आणि बुलेट घेऊन जा...

पुणे :- कोरोना विषाणुमुळे देशातील सर्व व्यवसाय पुर्णपणे ठप्प झालेत. याचा सर्वाधिक फटका पर्यटन आणि हॉटेल व्यवसायाला बसला. परंतु संसर्ग आटोक्यात येत असल्याने अनेक नियमांसह हॉटेल्स व्यवसाय पुन्हा सुरु झालेत. पण कोरोनाच्या भितीने ग्राहक हॉटेलकडे यायला तयार नाहीत. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना नफ्यापेक्षा तोटाच अधिक सहन करावा लागत आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हॉटेल मालकांनी नवनवे फंडे वापरण्यास सुरु केली आहे.

पुण्यातील शिवराज हॉटेल मालकाने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी चक्क रॉयल एनफिल्ड बुलेट देण्याचे घोषित केले आहे. परंतु ही बुलेट मिळवण्यासाठी हॉटेलने ग्राहकांना खास अटी व शर्ती दिल्या आहेत. परंतु तरुणांची शान आणि जान असलेली बुलेट जिंकण्यासाठी ग्राहकांना या हॉटेलची खास नॉन व्हेज थाळी ६० मिनिटात संपवावी लागणार आहे. या थाळीमध्ये जवळपास १२ पदार्थ आहेत. ज्यात ४ किलो मटण, फ्राय मच्छी, फ्राय सुरमई, पापलेट, चिकन तंदूरी, ड्राय मटण, ग्रे मटण, चिकन मसाला, कोळंबी व बिर्याणी यांसारखे पदार्थ आहेत. दरम्यान एकाच व्यक्तीला ही थाळी संपवायची आहे. जर ही थाळी ६० मिनिटात संपली तर ग्राहकांना 1 लाख 65 हजारांची बुलेट जिंकता येणार आहे. या हॉटेलमधील एकूण 55 कर्मचाऱ्यांनी मिळून ही खास थाळी तयार केली आहे.

पुण्यातील वडगाव मावळ भागात हे हॉटेल असून हॉटेलचे मालक अतुल वाईकर यांनी ही हटके, भन्नाट योजना सुरु केली आहे. शिवराज हॉटेलनं यापूर्वीही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी 60 मिनिटांमध्ये 'रावण थाळी' खाण्याची जरा योजना केली होती. 8 किलोची ही थाळी चार ग्राहकांनी एकत्रित 60 मिनिटांमध्ये संपवल्यास त्यांना 5 हजार रुपये बक्षिस आणि शिवाय त्या थाळीचं बिल माफ अशी ती योजना होती.

Post a Comment

0 Comments