Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य क्रिकेट स्पर्धा संपन्न.

खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य क्रिकेट स्पर्धा संपन्न.

पिंपरी चिंचवड :- दि. 20 जानेवारी (बुधवार) रोजी खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने भव्य हाफपिच क्रिकेट स्पर्धा पिंपरी चिंचवड येथे आयोजित करण्यात आली होती.

भव्यदिव्य अश्या क्रिकेट स्पर्धेला पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थिती दर्शवून स्पर्धेस चांगला प्रतिसाद दिला.


एजाज इलेवेन या संघाने प्रथम पारितोषिक मिळवून विजय प्राप्त केला. या वेळी कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती राष्ट्रवादी युवक काँग्रेस राष्ट्रीय सरचिटणीस शैलेश भाऊ मोहिते पाटिल, राष्ट्रवादी काँग्रेस कामगार संघटना उपाध्यक्ष जमील भाई आवटी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे युवा नेतृत्व निहाल आझमभाई पानसरे व प्रमुख मान्यवर राहुल भोसले, वैशालिताई घोडेकर, अश्विनिताई कांबळे, मीनाताई मंचरकर, समीर मासुळकर, अमित भोसले, महेश जाधव, निलेश शेट मोरे, हमिद शेख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष जावेद ईनामदार, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेश सचिव मुज्जम्मील शेख, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहर संघटक कुलदीप शर्मा, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पुणे शहर सरचिटणीस अजय पवार, युवक वडगावशेरी मतदारसंघ सचिव सुयोग जाधव, श्रीकांत भाई कोपुलवार उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन राहुलभाऊ भोसले स्पोर्ट्स क्लब, एजाज भाई चौधरी स्पोर्ट्स क्लब यांनी केले होते.

Post a Comment

0 Comments