वडगावशेरी मतदारसंघात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नवीन कार्यकारिणी आमदार सुनील टिंगरे व पुणे शहर अध्यक्ष महेश हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात आली. आमदार टिंगरे यांनी नवीन कार्यकर्त्यांना जोमाने काम करण्याचे सांगितले. व युवकांना जास्तीत जास्त कमिटी वर संधी देणार असल्याचे देखील सांगितले.
तसेच महेश हांडे यांनी युवकांना संबोधन करताना सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला शंभर टक्के संधी दिली जाते. त्यामुळे आपण काम करत राहा पक्ष देखील दखल घेत राहील. यावेळी वडगावशेरी मतदारसंघाचे अध्यक्ष नानासाहेब नलावडे, शहर उपाध्यक्ष राजेंद्र खांदवे, नगरसेवक भैय्यासाहेब जाधव, नगरसेविका सुमनताई पठारे, नगरसेवक महेंद्र पठारे, पुणे मनपा वृक्षसंवर्धन समिती सदस्य मनोज पाचपुते, युवक शहर उपाध्यक्ष जावेद भाई इनामदार, सरचिटणीस मोरेश्वर चांधेरे, महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी सचिव मुझ्झमिल शेख, पुणे शहर संघटक सचिव कुलदीप शर्मा, शैलेश राजगुरु, सदाशिव गायकवाड, उपाध्यक्ष सुहास तळेकर, अफसान शेख, सरचिटणीस संदीप पोकळे, संघटक सचिव राजू आबनावे, सुयोग जाधव, मतदारसंघ उपाध्यक्ष सोमनाथ साबळे व सोहेल शेख, नरेंद्र साबळे, विद्यार्थी पुणे शहर सरचिटणीस अजय पवार उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संपुर्ण आयोजन हे वडगावशेरी मतदारसंघाचे राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष किरण खैरे, कार्याध्यक्ष सागर खांदवे यांनी केले
Post a Comment
0 Comments