ब्रेकिंग न्यूज : पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला लागली भीषण आग...
पुणे :- कोरोना लसीसाठी संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या सिरम इन्स्टिट्यूट मध्ये एका इमारतीला आज दुपारी आग लागली आहे आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू असून येथून जवळच लसीचे उत्पादन केले जाते.
पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट मध्ये आज अचानक आग लागली. आगीचे कारण अद्याप समजलेले नाही, मात्र पुणे महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या या ठिकाणी रवाना झाले आहेत. दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली आहे. येथे लसीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर केली असून, यातील काही प्रमाणात लसीचे वितरण देशात रवाना करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी आग
लागलेली आहे, त्या ठिकाणी बीसीजी लसीचे उत्पादन केले जाते.
Post a Comment
0 Comments