Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

देशातली सर्वात स्वस्त SUV लॉन्च, मिळणार फक्त एवढया किमतीत...

देशातली सर्वात स्वस्त SUV लॉन्च, मिळणार फक्त एवढया किमतीत...

हिंदुस्थानी बाजारात वाहन उत्पादक कंपनी Nissan ने आपली सर्वात स्वस्त एसयूव्ही Magnite लॉन्च केली आहे. कंपनीने या कारची बुकिंग सुरु केली आहे. ग्राहक 11 हजारच्या टोकनसह ही कार बुक करू शकतात. आज आम्ही तुम्हाला या कारची किंमत आणि फीचर्स बद्दल माहिती सांगणार आहोत.

नवीन Magnite ला CMF-A + प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आले आहे. ज्याचा उपयोग ट्रायबरमध्येही केला गेला आहे. Magnite हिंदुस्थानात Nissan ची पहिली 4 मीटर एसयूव्ही आहे. ही एसयूव्ही XE, XL, XV आणि XV या चार व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. तसेच 9 वेगवेगळ्या कलर्समध्ये ही एसयूव्ही ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.

इंजिन आणि पॉवर किती असेल?

Nissan Magnite मध्ये कंपनीने 1.0 लिटर 3 सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन दिले आहे. जे 72HP पॉवर जनरेट करेल.

याच्या टॉप व्हेरिेएंटमध्ये 1.0 लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे 5-स्पीड मॅन्युअल आणि सीव्हीटी स्वयंचलित गिअरबॉक्ससह सुसज्ज असेल.

किंमत किती असणार ?

एका विशेष योजनेनुसार कंपनीने याची प्रारंभिक किंमत 31 डिसेंबर 2020 पर्यंत 4 लाख 99 हजार रुपये इतकी ठेवली आहे. 31 डिसेंबर नंतर याची प्रारंभिक किंमत वाढून 5 लाख 54 हजार रुपये असेल. ग्राहक 31 डिसेंबर 2020 पर्यंत कमी कंमतीत ही एसयूव्ही खरेदी करू शकतात.

Post a Comment

0 Comments