Type Here to Get Search Results !

मुज्जम्मील शेख यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते प्रवेश...

मुज्जम्मील शेख यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते प्रवेश...
पुणे :- 9 डिसेंबर (बुधवारी) सामाजिक कार्यकर्ते मुज्जम्मील शेख यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व कॅबिनेट मंत्री जयंत पाटील साहेब यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश घेतला. मागील काही दिवसांपासून शेख हे राजकारणात सक्रिय नव्हते. व मागील काळात विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ते राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सचिव व अहमदनगर जिल्हा निरीक्षक या पदावर कार्यरत होते. व त्यांनी अत्यंत प्रभावी असे काम केले आहे. आजही मुज्जम्मील शेख ह्यांना पक्षातील त्यांचे सहकाऱ्यांकडून चाणक्य असे उपमा दिली जाते. शेख ह्यांचा संपुर्ण महाराष्ट्रात दांडगा जनसंपर्क आहे. व त्यांच्या मागे चांगला जनमत आहे. व त्यांनी  कोरोना काळात त्यांच्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात उत्कृष्ट काम केले आहे. 
यावेळी बोलताना शेख म्हणाले,
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुटुंबात पुन्हा एकदा घटक म्हणून आलो आहे त्याचा मला खूप आनंद होत आहे. लवकरच मी पक्षाला शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे. पक्ष वाढवण्याचे काम करणार आहे. माझ्या वेगवेगळ्या पक्षात काम करत असलेल्या सहकाऱ्यांना देखील पक्षात आणणार आहेत.
या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष व आमदार चेतन तुपे पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, राष्ट्रीय सचिव सनी मानकर, किरण शिखरे, नगरसेवक दिपक मानकर, प्रशांत जगताप, दीपाली धुमाळ, सचिन दोडके, महिला विभागाचे शहराध्यक्ष स्वातीताई पोकळे, युवक अध्यक्ष महेश हांडे, जावेद ईनामदार, रुपेश गायकवाड, कुलदीप शर्मा व आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments