चिंचवड :- दि 25 डिसेंबर (बुधवारी) रात्री 8:30 वाजता सुमारास अजय प्रकाश सोनवणे वय वर्ष 24 राहणार ऑटो स्कीम हे आपल्या मोटार सायकलवरून जात असताना ऑटो स्कीम निगडी येथील स्वामी विवेकानंद शाळे समोरील चौकात मुले खेळत असल्याने मोटार सायकलचा हॉर्न वाजविला या शुल्लक कारणावरून चिडून आरोपी राजू वाले, अमोल वाले व आनंद वाले यांनी भांडण काढून लोखंडी कोयते व तलवारी घेऊन येऊन अजय सोनवणे व त्यांचा मित्र प्रसाद शिरसागर यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर वार करून गंभीर जखमी केले व परिसरात दहशत माजविल्याने फिर्यादी अजय सोनवणे यांनी निगडी पोलिस ठाणेत फिर्याद दिले. दिलेल्या फिर्यादीवरून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न आर्म ऍक्ट प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आले. वरिष्ठांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या गुन्हे शाखेत सूचना दिल्या होत्या.
सदर गुन्ह्याचा गुन्हे शाखेकडून समांतर तपास करीत असताना पोलिस निरीक्षक शैलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा शोध सुरू असताना पोलिस उपनिरीक्षक संजय निलपत्रेवार, पोलीस हवालदार शिवानंद स्वामी, दिपक खरात, पोलीस नाईक जयवंत राऊत, विठ्ठल जाधव, जमीर तांबोळी, अजित सानप व शिवाजी मुंडे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारा कडून मिळालेल्या माहिती वरून तांत्रिक विश्लेषण विभागाने माहिती मदतीने गुन्ह्यातील पहिले आरोपी 1) अमोल वाले वय वर्ष 23, 2) मेघराज संजय वाले वय वर्ष 25 दोघे राहणार ऑटोस्कीम निगडी यांना खेड राजगुरुनगर परिसरातून सापळा लावून अटक करण्यात आले.
सदर आरोपीला खेड राजगुरूनगर येथे पोलीस उपनिरीक्षक संजय निलपत्रेवार व त्यांचे टीमने शीताफीने पाठलाग करून पकडले आहे. आरोपींना निगडी पोलीस ठाण्याकडे हजर केले आहे. सदरची कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उप आयुक्त गुन्हे सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा 1 चे आर आर पाटील, गुन्हे शाखा 2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, उपनिरीक्षक संजय निलपत्रेवार, अंमलदार शिवानंद स्वामी, दीपक खरात, केराप्पा माने, प्रमोद वेताळ, वसंत खोमणे, हवालदार उषा दळे, दिलीप चौधरी, विपुल जाधव, जमीर तांबोळी, जयवंत राऊत, नामदेव राऊत, अजित सानप, शिवाजी मुंढे व तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोलीस अंमलदार शेठे व माळी यांच्या पथकाने कारवाई केली आहे.
Post a Comment
0 Comments